मुंबई : आयपीएलचे सामने शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत. आता ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यंदाच्या हंगामात 2 नव्या टीम चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. याच दरम्यान चेन्नईचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाने मोठं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या हंगामात सुरेश रैना अनसोल्ड राहिला. त्यानंतर त्याच्याकडे कमेंट्री करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सुरेश रैनाने यंदा ट्रॉफी कोणी जिंकवी यावर भाष्य केलं आहे. सुरेश रैनाला यावेळी विराट कोहलीची दयाही आल्याचं पाहायला मिळालं. 


रैनाच्या म्हणण्यानुसार यंदा ट्रॉफी बंगळुरू टीमने जिंकायला हवी. विराट कोहलीसाठी बंगळुरू टीमने ही ट्रॉफी जिंकायला हवी असं रैना म्हणाला आहे. रैनाचं हे विधान सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


आतापर्यंत एकदाही बंगळुरू टीमने आयपीएलची ट्रॉफी मिळवली नाही. प्लेऑफपर्यंत पोहोचूनही बंगळुरू टीम ट्रॉफी मिळवू शकली नाही. यावेळी इतिहास बदलण्याची संधी बंगळुरू टीमला आहे. 


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर आहे. सुरेश रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये 5528 धावा करण्याचा विक्रम आहे. सुरेश रैनाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 39 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. 


सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखतात. यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये तो यंदा अनसोल्ड राहिला. सुरेश रैनाचा जुना आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सनेही त्याला पुन्हा आपल्या टीममध्ये घेतलं नाही.