सुरेश रैनाची CSK च्या कोचपदी होणार नियुक्ती? चेन्नई मोठा निर्णय घेण्याची शक्यता
चेन्नईचे आतापर्यंत 8 सामने झाले असून यापैकी 6 सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई : आयपीएलचा यंदाचा सिझन चेन्नई सुपर किंग्जसाठी फार वाईट ठरला आहे. चेन्नईचे आतापर्यंत 8 सामने झाले असून यापैकी 6 सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर कर्णधार रविंद्र जडेजाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं असून चाहत्यांना पुन्हा एकदा सुरेश रैनाची आठवण झाली आहे.
पंजाब किंग्जविरुद्ध सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला 11 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. पंजाब किंग्जकडून झालेल्या या पराभवानंतर चाहत्यांना सुरेश रैनाची आठवण झाली. त्यासोबतच चाहत्यांनी सोशल मीडियावर शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.
यावेळी एका युझरने चेन्नईच्या टीमकडे सुरेश रैनाला फिल्डींग कोच बनवण्याची मागणी केली आहे. चेन्नईच्या डगआऊटला रैनाची गरज असल्याचंही या चाहत्याने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युझरने, आम्ही सुरेश रैनाला मीस करत असल्याचं म्हटलं आहे.
तर, सुरेश रैना एक उत्तम फिल्डर असल्याचंही, एका युझरने ट्विट केलं आहे. तर फिल्डींगच्याबाबतीत सुरैश रैनाचा हात कोणीही पकडू शकत नाही, असंही एकाने म्हटलं आहे. तसंच रैनाशिवाय चेन्नईचं काहीही होणार नाही, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे.
कालच्या सामन्यात पंजाबने चेन्नईचा 11 रन्सने पराभव केला. यंदाच्या आयपीएलमधील हा चेन्नईचा सहावा पराभव होता. पंजाबविरूद्धच्या पराभवामुळे चेन्नईचा प्लेऑफपर्यंतचा प्रवास कठीण झाला आहे.