Suryakumar Yadav : आयपीएलचा ( Indian Premier League 2023 ) 16 वा सिझन सध्या सुरु असून पॉईंट्स टेबलच्या टॉपवर गुजरात टायटन्सची टीम आहे. तर तिसऱ्या स्थानावर सर्वात लोकप्रिय मुंबई इंडियन्सची टीम आहे. मुंबई टीमचा सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) सध्या उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतंय. मुंबई विरूद्ध ( Mumbai Indians ) रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) या सामन्यात सूर्याची बॅट चांगलीच तळपली होती. सूर्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने 6 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात सूर्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर बंगळूरूविरूद्धच्या सामन्यात सूर्याने उत्तम फलंदाजी केली. या सामन्यात सूर्याने 35 बॉल्समध्ये 83 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये त्याने 7 फोर आणि 6 सिक्स लगावले आहेत. दरम्यान या सामन्यात सूर्याला 5 अवॉर्ड देण्यात आले. 


सूर्याला कोणते मिळाले अवॉर्ड?


रॉयल चॅलेंजर बंगळूरूविरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमारला सर्वाधिक फोर, मोस्ट वॅल्यूएबल असेट ऑफ द मॅच, ड्रीम 11 गेमचेंजर ऑफ द मॅच, इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच असे पुरस्कार देण्यात आले. दरम्यान हे अवॉर्ड मिळाल्यामुळे सूर्यकुमार मालामाल झाला. 


या संपूर्ण अवॉर्ड्सचे सूर्याला किती पैसे मिळाले असतील



याचा अंदाज तुम्ही लावलाय का? सूर्याला मिळालेल्या या अवॉर्डपैकी प्रत्येक अवॉर्डची किंमत 1 लाख रूपये होती. त्यानुसार, या मॅचमध्ये सूर्याची अवॉर्ड्सद्वारे तब्बल 5 लाख रूपये कमाई झाली. 


 


सूर्याच्या फलंदाजीसमोर आरसीबी ढेर


रॉयल चॅलेंजर विरूद्धच्या सामन्यात आरसीबीच्या टीमने प्रथम फलंदाजी केली. यावेळी आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 199 रन्स करत मुंबईला 200 रन्सचं टार्गेट दिलं. या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबईकडून इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी केली. सूर्याच्या 83 रन्सच्या खेळीसमोर आरसीबीच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले.


पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची तिसऱ्या स्थानी झेप


आरसीबीवर विजय मिळवण्यापूर्वी मुंबईची टीम 8 व्या स्थानी होती. मात्र आरसीबीच्या टीमचा 6 विकेट्सने पराभव केल्याने 8 व्या क्रमांकावरुन मुंबईने थेट तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. मुंबईने 11 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहे. या सहा सामन्यांचे त्यांच्या खात्यात 12 पॉईंट्स जमा झालेत.