Suryakumar Yadav Century : भारत आणि साऊथ अफ्रिका (SA vs IND) यांच्यात खेळवल्या जात असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने वादळी शतक ठोकलं आहे. साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत सूर्यकुमार यादवने 55 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. सूर्याने 56 चेंडूंत 7 चौकार व 8 षटकारांसह 100 धावा पूर्ण केल्या. चार वेगवेगळ्या संघांविरुद्ध टी-ट्वेंटीमध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर टी-ट्वेंटीमध्ये सर्वांधिक शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्याने नाव कमावलं आहे. सूर्याने सावध सुरूवात केली होती. सूर्याने पहिल्या 25 बॉलमध्ये फक्त 27 धावा केल्या होत्या. मात्र, सूर्याने गियर बदलले अन् पुढील 31 बॉलमध्ये 73 धावांची आक्रमक खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितच्या विक्रमाची बरोबरी


सूर्यकुमार यादवने फक्त 57 डावात चौथं शतक ठोकलंय. तर ग्लेन मॅक्सवेल याने 92 डावात चार शतकं ठोकली आहेत. तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने 140 इनिंगमध्ये 4 शतकं ठोकली आहेत. त्यामुळे मुंबईच्या सुर्याने लोकल न पकडा सुपरफास्ट पकडलीये, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सूर्याने भारत, इंग्लंड, साऊथ अफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये या चारही देशात शतक ठोकलंय.



टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.


साऊथ अफ्रिका : एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.