वनडे सामन्यात का ठरतोय Suryakumar Yadav फेल? Wasim Jaffer ने सांगितली सूर्याची चूक
टी-20 क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) तुफान फलंदाजी होती, तशी वनडे सामन्यात सूर्याला खेळी करता आली नाही.
Wasim Jaffer On Suryakumar Yadav : नुकतंच टीम इंडियाने न्यूझीलंडचा (India vs New Zealand) दौरा संपवला. न्यूझीलंडविरूद्ध टीम इंडियाने टी-20 सिरीज जिंकली. मात्र वनडे सिरीजमध्ये भारताला 0-1 ने पराभव स्विकारावा लागला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) तुफान फलंदाजी होती, तशी वनडे सामन्यात सूर्याला खेळी करता आली नाही. दरम्यान वनडे सामन्यात सूर्याची बॅट का फिकी पडली याचं उत्तर माजी खेळाडू वसीम जाफरने (Wasim Jaffer) दिलं आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 306 रन्स केले होते, मात्र या सामन्यात सूर्याला मोठी खेळी करता आली नाही. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला, तर तिसऱ्या वनडेमध्ये सामन्यात त्याने हळू सुरुवात केली आणि चांगले शॉट्स खेळले मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला.
क्रिकेट एक्सपर्ट्स यांच्या मतानुसार, टी-20 प्रमाणे वनडे सामन्यात सूर्या अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करत नाहीये. हेच कारण आहे की, त्याला आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाहीये.
वसीम जाफर यांनी काय म्हटलं?
टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर याने सांगितंल की, टी-20 क्रिकेटमध्ये नेहमी स्लिपवर फील्डर नाही उभा केला जात नाही, त्यामुळे अनेकवेळा फलंजाद कॅच आऊट होत नाहीत. दुसरीकडे वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये कधी 1 तर कधी 2-3 फील्डर स्लिपमध्ये ठेवले जातात. जेणेकरून छोट्या चुकीने विकेट जाऊ शकतो.
सूर्या पहिल्या वनडे सामन्यात स्लिपमध्ये कॅच देऊन आऊट झाला. तर तिसऱ्या वनडे सामन्यात तो स्लिपमध्ये कॅट आऊट होता होता वाचला. जाफरच्या म्हणण्याप्रमाणे, मोठ्या फॉर्मेटमध्ये सूर्याला चांगला खेळ करायचा असेल तर त्याला त्याला खेळ सुधारणं गरजेचं आहे.
वनडेमध्ये सूर्याची कामगिरी
न्यूझीलंडविरूद्धच्या 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये त्याने 22 च्या सरासरीने आणि 115 च्या स्ट्राईक रेटने केवळ 44 रन्स केले आहेत. यावेळी पहिल्या सामन्यात केवळ 4 रन्स आणि तिसऱ्या सामन्यात अवघे 6 रन्स करून तो बाद झाला.
न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला बांगलादेशाचा दौरा करायचा आहे. यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज आणि 2 सामन्यांची टेस्ट सिरीज भारताला खेळायची आहे. मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला या सिरीजच्या बाहेर ठेवण्यात आलंय. जाणून घेऊया सूर्याला या सिरीजमध्ये का निवडलं नाही.
सूर्याला का नाही मिळाली संधी?
न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे सिरीजनंतर काही खेळाडू बांगलादेशासाठी रवाना होणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत अनुभवी खेळाडूंचं कमबॅक होणार आहे. मात्र या सिरीजमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला बाहेर ठेवण्यात आलंय.