मुंबई : Suryakumar Yadav: आशिया कप स्पर्धेत वादळी खेळी खेळणारा आणि भारताचा स्टार मिडल ऑर्डर फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. Asia Cup मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्ध धडाकेबाज खेळी करणाऱ्या सुर्या आता आगामी T20 World Cup साठी सज्ज झालाय. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची मोठी जबाबदारी सुर्यकुमारच्या खांद्यावर असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुर्यकुमार यादवने T20 World Cup आधी त्याच्या गेम प्लॅन विषयी खुलासा केलाय. सामन्याआधी दोन दिवस मी बॅटला हात सुद्धा लावत नाही, असं सुर्या म्हणाला. सामन्याआधीचा दिवस तो सुट्टीसारखा घालवतो. सामन्यापूर्वीचा वेळ सुर्या पत्नीसोबत घालवणं पसंत करतो. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुर्यकुमारने हा खुलासा केला आहे.


काय म्हणाला Suryakumar Yadav?


सामन्याआधी सुर्यकुमार नेट प्रॅक्टिस करतो का? आणि काही खास रणनिती असते का?, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर सुर्या म्हणतो, "मी मागील 4 वर्षापासून एकाच रणनितीचा वापर करतो. त्याचा मला खुप फायदा देखील झालाय. सामन्याच्या एक दिवस आधी मी सुट्टी घेतो. जेवढी प्रॅक्टिस करायची असेल ती दोन दिवस आधीच केलेली असते. सामन्याआधी मी माझा वेळ पत्नीसोबत घालवतो. यावेळी आम्ही क्रिकेटवर काहीही बोलत नाही."


"मी मॅचमध्ये चांगला खेळू किंवा किंवा वाईट, माझी बायको नेहमी मला सपोर्ट करते. तिने माझ्या डोक्यात हे पक्कं बसवून ठेवलंय की, मी जसा आहे तसाच राहिलं पाहिजे, मग मी चांगलं खेळू करू किंवा वाईट", असं म्हणत Suryakumar Yadav ने मनमोकळ्या गप्पा मारल्या.


Cricket New Rule : आता IPLमध्ये 11 नाही तर 15 खेळाडू खेळणार? BCCI नव्या घोषणेच्या तयारीत!
 
T20 World Cup चमकदार कामगिरीची अपेक्षा


सुर्यकुमार सध्या जबरदस्त फॉममध्ये आहे. आशिया कपमध्ये त्याची बॅट तळपली होती. अशाच त्याच्याकडून T20 World Cup चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. सुर्यकुमारने टीम इंडियासाठी आत्तापर्यंत 13 वनडे सामने आणि 28 टी 20 सामने खेळले आहेत. टी 20 मध्ये त्याच्या नावावर एक वादळी शतक देखील आहे.