मुंबई : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी अखेर तो क्षण काल आलाच. मुंबईने यंदाच्या सिझनमध्ये पहिला विजय मिळवत 2 पॉईंट्स कमावलेत. मुंबईच्या पहिल्या विजयानंतर चाहते फार आनंदी आहेत. मंबईने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव केला. यावेळी आयपीएलच्या दोन स्टार खेळाडूंमध्ये बाचाबाची होता-होता राहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच्या सामन्यात आयपीएलचे दोन स्टार युजवेंद्र चहल आणि सूर्यकुमार यादव आमनेसामने आले. ज्यामध्ये गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात मजेशीर घटना घडलेली दिसली. सुर्यकुमार यादवने चहलला मैदानात मिठी मारली. मात्र याचा व्हायरल झालेला फोटो पहाताच झप्पी की कीस असा प्रश्न युझर्सने उपस्थित केलाय.



ही घटना सामन्याच्या 8व्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला त्याच्या फिरकीत जवळपास अडकवलं होतं. चहलचा बॉल यादवच्या पॅडवर लागला होता. या घटनेनंतर चहलने अपील केलं. अंपयारने नॉटआऊट दिल्यानंतर चहलने विलंब न लावता डीआरएस घेतला.


यानंतर थर्ड अंपायरच्या निर्णयाने युझवेंद्र चहल निराश झाला कारण  त्यांचा निर्णय फलंदाजाच्या बाजूने गेला. त्याचवेळी थर्ड अंपायरच्या या निर्णयावर चहल चांगलाच संतापला होता. तर, त्याला नाबाद फलंदाज सूर्यकुमार यादवने मिठी मारली. यानंतर चहल लगेच शांतंही झाला. 


चहल आणि यादव यांच्या जादुई झप्पीचा व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मुंबईने आयपीएलच्या 15 व्या सिझनमधीस (IPL 2022) पहिला विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सने विजय मात केली आहे. डॅनियल सॅम्सने विजयी सिक्स मारला.  राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचं आव्हान मुंबईने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.