Suryakumar Yadav Injury : आयसीसीच्या मोठ्या इवेंटमध्ये टीम इंडियाला अनेकदा मोठे धक्के बसले आहेत. अशातच आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी (T20 World Cup 2024) टीम इंडिया बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. कारण टीम इंडियाचा धुरंदर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर आलीये. तो किमान 7 आठवडे मैदानापासून दूर राहणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादवने अलीकडेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. त्यामुळे रोहितनंतर टी-ट्वेंटी धुरा सूर्यकुमारकडे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशातच आता सूर्या जखमी झाल्याने आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत सूर्या खेळताना दिसणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेला सूर्या मुकणार असल्याने टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? यावर सर्वांच लक्ष असणार आहे.


जोहान्सबर्गमध्ये टी-ट्वेंटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्याच्या घोट्याला मार लागला होता. मात्र, तो मैदानात फिल्डिंग करताना दिसला होता. त्याने मैदान सोडलं नव्हतं. गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर सूर्याचे स्कॅनिंग करण्यात आलं. त्यानंतर घोट्याला ग्रेड-2 दुखापत झाल्याची माहिती कळालीये. त्यामुळे सूर्या किमान 7 आठवडे मैदानाबाहेर असण्याची शक्यता आहे. 


सूर्याला बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याच्या पुनर्वसनासाठी त्याला नंतर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पाठवलं जाईल. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो नक्कीच खेळू शकणार नाही, अशी माहिती  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) संबंधित सूत्रांनी दिली आहे.


आणखी वाचा - IND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन


कसं असेल शेड्यूल (India vs Afghanistan schedule)


दरम्यान, तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहाली येथे, त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 14 आणि 17 जानेवारी रोजी इंदूर आणि बेंगळुरू येथे होणार आहे.