Suryakumar yadav Vice Captain : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी रात्री उशिरा ही घोषणा केली आहे. यामध्ये हार्दिक पांड्याकडे टी-20 सिरीजसाठी टीमचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. याशिवाय वनडे सिरीजमध्ये रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करेल. यामध्ये मराठमोळा खेळाडू सूर्याकुमार यादवला लॉटरी लागली आहे. सूर्यकुमार यादवला टी-20 टीमचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. 


टी-20 सिरीजसाठी टीम इंडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार


टी-20 फॉर्मेटमध्ये सूर्यकुमार नंबर 1


आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीमध्ये नंबर 1 फलंदाज बनलाय. याशिवाय सूर्यकुमार यादवने 2022 साली सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय रन्स केल्याची नोंद आहे. या वर्षी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन शतकं झळकावणारा सूर्यकुमार यादव हा भारताचा एकमेव फलंदाज असल्याची माहिती आहे.


सूर्यकुमार यादवने यंदाच्या टी-20 वर्ल्डकप आणि आशिया कपच्या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली. T20 आंतरराष्ट्रीय मध्ये सूर्याने 2022 मध्ये 31 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 1164 रन्स केलेत. यादरम्यान सूर्यकुमार यादवची सरासरी 46.56 आहे, तर स्ट्राइक रेट 187.43 आहे. याशिवाय यादवला यंदाच्या वर्षी 2 शतकांव्यतिरिक्त 9 वेळा पन्नास रन्सचा आकडा गाठता आला आहे.


रणजी ट्रॉफीमध्येही सूर्याचा जलवा कायम


मुंबई आणि हैदराबाद (Mumbai vs Hyderabad) यांच्यामध्ये रणजीचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात देखील सूर्यकुमार यादवने त्याच्या तुफान फलंदाजीचा नजराणा दाखवला. जवळपास 3 वर्षांनंतर सुर्यकुमारने रेड बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक केलं, आणि धडाकेबाद फलंदाजी सर्वाचं मन जिंकलं. सूर्यकुमारने 80 बॉलमध्ये 90 रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने 15 फोर आणि 1 सिक्स देखील लगावला आहे. सूर्याने जवळपास 113 च्या स्ट्राईक रेटने रन केलेत. मात्र यावेळी तो शतक पूर्ण करू शकला नाही. 90 रन्सवर तो LBW आऊट झाला. त्यामुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत.


श्रीलंका वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (wk), इशान किशन (wk), हार्दिक पंड्या (VC), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.