Suryakumar Yadav apologize: भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्याची टी-20 सीरिज खेळवण्यात येतेय. 29 जानेवारी रोजी या सीरिजमधील दुसरा सामना खेळवण्यात आला आणि टीम इंडियाने (Team India) तो जिंकला. या विजयासह टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता 1 फेब्रुवारी रोजी होणारा सामना दोन्ही टीम्ससाठी निर्णायक सामना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी झालेल्या सामन्यामध्ये उपकर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने मोलाची भूमिका बजावली. ज्यासाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यानंतर सूर्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सामन्यामध्ये असा एक क्षण आला होता, जी माझी चूक असल्याचं सूर्याने मान्य केलं आहे. 


न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये सूर्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' घोषित केल्यानंतर त्याने मोठं विधान केलं. रविवारच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि सूर्या यांच्यामध्ये पार्टनरशीप होत होती. मात्र एका चुकीमुळे सुंदर रनआऊट झाला. दरम्यान ही चूक दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून, माझी असल्याचं, सूर्याने सामन्यानंतर म्हटलंय. 


सूर्यकुमार यादव म्हणाला की, "SKY आज एका वेगळ्या रूपात पहायला मिळाला. हे पिच फलंदाजांसाठी सोप्प नव्हतं. वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटनंतर एका फलंदाजाला टिकून राहणं गरजेचं होतं. मुळात वॉशी ज्या पद्धतीने आऊट झाला, ती माझी चूक होती. शेवटच्या ओव्हरमध्ये मला माहिती होतं की, जिंकण्यासाठी आम्हाला एका चांगल्या शॉटची गरज आहे. त्यावेळी हार्दिकने मला जवळ येऊन सांगितलं की, हा तू विनिंग बॉल बनव आणि त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला" 


अटीतटीच्या सामन्यात टीम इंडिया विजय


अटीतटीच्या या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा गडी राखून पराभव केला आहे. अखेरच्या ओव्हरला 6 धावाची गरज होती. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पांड्या (hardik pandya) मैदानावर होता. तर सूर्यकुमार देखील 21 धावा करत खेळत होता. अखेरच्या दोन बॉलवर तीन धावांची गरज असताना सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) चौकार खेचत सामना भारताच्या पारड्यात खेचला. (IND vs NZ 2nd T20 Team India defeated New Zealand by 6 wickets)


भारतीय गोलंदाजांनी रविवारी कमाल केली. एकामागून एक गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या बॉटर्सला तंबूत पाठवलं. पांड्या, सुंदर, चहल, हुड्डा, कुलदीप आणि अर्शदीपने विकेट घेतल्या आणि भारताला पहिल्याच डावात विजयाच्या उंभरठ्यावर आणून ठेवलं. त्यानंतर बाकीचं काम भारतीय फलंदाजांनी पूर्ण केलं. भारताकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)  सर्वाधिक 26 धावा केल्या. तर ईशान किशनने (Ishan Kishan) 19 धावांची खेळी केली.