Suryakumar Yadav: मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेला सूर्यकुमार वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय. टीम इंडियाचा आगामी सामना वानखेडेवर असल्याने टीम इंडिया मुंबईत आली. अशावेळी मुंबईत येताच सूर्यकुमार यादवचा एक वेगळा लूक समोर आला. सूर्या कॉमन मॅन बनत आपली ओळख लपवून थेट कॅमेरामॅन बनला होता. यावेळी त्याने चाहत्यांना स्वतःसंबंधी काही प्रश्नही विचारलेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी मुंबईत सूर्यकुमार यादवने आपला अनोखा अवतार चाहत्यांना दाखवला. सूर्यकुमार यादव यांचा हा अवतार असा होता की, मुंबईतील सर्वसामान्य जनताही त्यांच्या स्टार क्रिकेटरला ओळखू शकली नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाही सूर्याला ओळखू शकला नाही.


इंडियन क्रिकेट टीमच्या ऑफिशियल अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये, सूर्यकुमार यादव कॅमेरामनच्या भूमिकेत मुंबईकरांसी संवाद साधताना दिसतोय. सूर्या म्हणतो, माझे टॅटू दिसू नयेत म्हणून मी फुल हँन्ड्स शर्ट घातला आहे. तर प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी सूर्याने पांढरा प्रिंटेड शर्ट घातला होता आणि पांढरं मास्क लावलं होतं. याशिवाय डोळे दिसू नये यासाठी काळ्या रंगाचे सनग्लासेस आणि काळी टोपी घातली होती.


मुंबईकरांशी सूर्याने साधला संवाद


सूर्या नरिमन पॉइंटवर जाऊन सर्वसामान्यांशी ओळख लपवून बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतंय. सूर्याने कॅमेरा हातात घेतला आहे आणि तो लोकांना विचारतोय की, तुमचा मुंबईचा आवडता क्रिकेटर कोण आहे. सर्वसामान्य जनताही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होती. यावेळी सूर्याने त्याच्या फलंदाजीबद्दल चाहत्यांना प्रश्नही विचारले, यावेळी एका चाहत्याने सूर्याला खेळण्याची अजून संधी मिळायला पाहिजे आणि त्याने अजून चांगलं खेळलं पाहिजे, असं म्हटलंय. 


शेवटी एका महिला चाहत्यासमोर सूर्याने मास्क आणि गॉगल काढून आपली ओळख दाखवली. यानंतर त्या चाहतीने सूर्यासोबत फोटो क्लिक केला.



श्रीलंकेशी रंगणार भारताचा सामना


टीम इंडिया गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ग्रुप स्टेजमधील सातव्या सामन्यात श्रीलंकेशी भिडणार आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीमबाहेर असल्यामुळे या सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची आशा आहे. सूर्याला त्याच्या होम ग्राऊंडवर उत्कृष्ट खेळी करण्याची ही चांगली संधी आहे.