मुंबई : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना दणदणीत जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने तुफानी खेळी केली. त्याच्यामुळेच टीम इंडिया विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरली. या सामन्यात के.एल राहुलसोबत मिळून सूर्यकुमारने उत्तम फलंदाजी केली. मात्र सामन्यानंतर के.एल राहुलने सूर्यकुमारच्या भीतीबद्दलचा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमारला डावाच्या सुरुवातीला सूर्याला एनरिक नॉर्शियासमोरही संघर्ष करावा लागला. सामन्यानंतर केएल राहुलने सूर्यकुमारने पीचवर काय सांगितलं याबाबत खुलासा केलाय. राहुल म्हणाला, "सूर्यकुमारने मला सांगितलं की, मी या पीचवर डिफेंसिव खेळलो तर मला खात्री नाही की, मी टीमसाठी किती योगदान देऊ शकेन. मी माझे शॉट्स खेळेन आणि मी रन्स कसे करता येईल ते बघेन.”


के. एल राहुलने सांगितल्यानुसार, सूर्यकुमार यादवला डिफेंसिव खेळण्याची भीती वाटत असल्याचा अंदाज अनेकांनी लावला आहे.


सूर्यकुमार यादवने मोठी कामगिरी  


सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तुफानी खेळी केली. त्याने केवळ 33 चेंडूत 50 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. एकेकाळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या विकेट्स गमावल्याने टीम इंडिया अडचणीत आल्याचे दिसत होते, मात्र सूर्यकुमार यादवने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून दिला. 


शिखर धवनने विक्रम मोडला 


सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये धावत आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पहिला आला आहे. त्याने शिखर धवनला मागे टाकले आहे. सूर्यकुमार यादवने 2022 च्या 21 डावात 732 धावा केल्या आहेत, तर धवनने 2018 मध्ये 689 धावा केल्या आहेत.