Surykumar Yadav Icc Nomination : टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादव (Surykumar Yadav) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह, देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातलाय. त्याच्या फलंदाजीचे दिग्गज खेळाडू देखील दिवाने आहेत. सुर्याच्या (Surykumar Yadav)  फलंदाजीची क्रिकेट वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते. आता याच खेळाडूच्या फलंदाजीची भूरळ आयसीसीलाही पडली आहे. आयसीसीने पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी सुर्यकुमार यादवचं नामांकन दिले आहे. आता हा पुरस्कार त्याला मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


हजार धावा करणारा दुसरा खेळाडू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav)  2022 या वर्षात टी20 फॉरमॅटमध्ये स्फोटक फलंदाजी केली होती. मैदानावरील त्याच्या 360 डिग्री खेळीने त्याने एका वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. यामुळे तो T20 फॉरमॅटमध्ये एका वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. 


वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरी 


सूर्यकुमार यादवसाठी (Surykumar Yadav) 2022 हे वर्ष खुपच चांगले होते. या वर्षात त्याने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. टी20 फॉरमॅटमध्ये तो एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरणार होता.मात्र तो थोडक्यासाठी हुकला होता. सूर्यकुमार यादवने 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 अशा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून वर्षाचा शेवट केला. या खेळीत त्याने 2 शतक आणि 9 अर्धशतक झळकावली आहेत. 


वर्ल्ड कपमध्ये मोठं योगदान


ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये देखील सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) खुप मोठं योगदान दिले होते. सुर्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये 59.75 च्या सरासरीने आणि 189.68 च्या स्ट्राइक रेटने 239 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक ठोकलं होते. 


स्फोटक सेंच्यूरी


सुर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) न्यूझीलंडविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे झालेल्या दुसऱ्या T20 मध्ये 51 चेंडूत 111 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याने 217.65 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. ही त्याची दुसरी सेंच्यूरी होती. तर पहिली सेंच्यूरी त्याने ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम येथे इंग्लंड विरुद्ध ठोकली होती. त्याने 55 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. या त्याच्या खेळीचे क्रिकेट फॅन्स दिवाने झाले होते.


दरम्यान सुर्यकूमार (Surykumar Yadav)  सह इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम कुरन, झिम्बाब्वेचा ऑफस्पिनर अष्टपैलू सिकंदर रझा आणि पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांनाही 'ICC पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022' या सन्मानासाठी नामांकन मिळाले आहे. त्यामुळे आता हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.