सेम टू सेम! 3 वर्षापूर्वी टीम इंडियाच्या `या` प्लेयरने घेतला होता सुर्यासारखा बॉर्डर लाईनवर कॅच; पाहा VIDEO
Surya Boundary-line Catch: सुर्यासारखाच कारनामा 3 वर्षापुर्वीदेखील झालाय. त्यातही दुधात साखर म्हणजे टीम इंडियाच्या प्लेयरनेच हा कारनामा केला होता.
Surya Boundary-line Catch: टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला धूळ चारत टी 20 वर्ल्ड कप खिशात घातला. याला 1 दिवस उलटून गेला असला तरी भारतीयांच्या मनातून या आठवणी जात नाहीयत. मॅचमधील टीम इंडियाने केलेला प्रत्येक रन्स तसेच टाकलेल्या प्रत्येक बॉलची आणि फिल्डिंगची चर्चा होते. ते किस्से पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगितले जात आहेत. यात सुर्यकुमारने घेतलेला कॅच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. ही कॅच पुन्हा पुन्हा पाहिली जात आहे. देशभरात सुर्याचे कौतुक केलं जातंय. पण असाच कारनामा 3 वर्षापुर्वीदेखील झालाय. त्यातही दुधात साखर म्हणजे टीम इंडियाच्या प्लेयरनेच हा कारनामा केला होता. आता सुर्यासोबत हा जुना व्हिडीओदेखील व्हायरल होतोय. याबद्दल माहिती घेऊया.
देशभरात सध्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या रोहित शर्मा आणि टिमची चर्चा सुरु आहे. लवकरच त्यांचे भारतात जल्लोषात स्वागत केलं जाईल. दरम्यान डेव्हिड मिलरचा सुर्यकुमारने घेतलेला कॅच कोणाच्या डोळ्यासमोरुन जात नाहीय. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्सच्या बदल्यात 176 धावा केल्या होत्या. पण साऊथ आफ्रिकेचा संघ 20 ओव्हरमध्ये 168 धावाच करु शकला. कोहली आणि अक्षर पटेलची बॅटींग, बुमराह, अर्शदीप, पांड्याची ओव्हर, रोहितची कॅप्टन्सी असे अनेक विजयाचे फॅक्टर सांगता येतील. पण लक्षात राहिला तो सुर्यकुमारने मिलरचा घेतलेला कॅच.
सुर्याच्या कॅचचा व्हिडीओ
असाच कॅच 2021 मध्ये टीम इंडियाच्या महिला क्रिकेटर हर्लिन देओल हिने घेतला होता. तिने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सर्व ठिकाणी हा व्हिडीओ शेअर केला जातोय. हा व्हिडीओ जुलै 2021 मध्ये झालेल्या इंडिया विरुद्ध इंग्लंड मॅचचा आहे. त्यावेळी सुरु असलेल्या टी 20 सामन्यात इंग्लंडची स्थिती विकेट्सच्या बदल्यात 166 अशी होती. जोन्स 26 बॉलवर 43 रन्स अशी धमाकेदार बॅटींग करत होती. त्यावेळी हर्लिनच्या दिशेने हा बॉल आला. जो सीमा रेषेच्या पलिकडे जात होता. हर्लिनने बॉल सिक्सर जाण्यापासून अडवला. हवेतच बॉण्ड्रीच्या आत ढकलला. त्यानंतर पिच बाहेर गेली. त्याच आवेगाने तिने आत जम्प केली आणि कॅच पकडली.