इंदूर : कुस्तीच्या खेळात वजनाचं फार महत्व असतं. खेळाडूंना वेगवेगळ्या वजनी गटात खेळावं लागतं. त्यामुळे ज्या वजनी गटात खेळायचं त्यानुसारच वजन राखावं लागतं. 


वजनाचं आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे कुस्तीसाठीचा व्यायाम तर दुसरीकडे तंदुरुस्तीसाठी विशिष्ट खुराक यांच्यामधली कसरत करत वजन नियमीत राखणं असं आव्हान पहिलवानासमोर असतं. 


सुशील कुमार राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपमध्य़े


८ वर्षांच्या खंडानंतर सुशील कुमार मध्य प्रदेशातल्या इंदूर येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपमध्य़े भाग घेत होता. १५ नोव्हेंबरला तो पोहोचला तेव्हा त्याचं वजन ७५ किलो ८०० ग्रॅम होतं. ७४ किलो वजनी गटात खेळायचं असल्यामुळे जवळपास २ किलो वजन जास्त होतं. हे जास्तीचं वजन सुशील कुमारने एअरफोर्सच्या १२५ किलो वजनी गटाच्या पहिलवानासोबत ३ तास सराव करून कमी केलं. सरावानंतर सुशील कुमारचं वजन २ किलो १०० ग्रॅम कमी भरलं.


सुशील कुमारचा फंडा


कधी कधी ४ ते ५ किलो वजनसुद्धा कमी करावं लागतं आणि यासाठी ३-४ दिवस खूप महनत घ्यावी लागते, असं सुशील कुमारने सांगितलं.