भारतीय गोलंदाजाची कमाल, हॅट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स, पाहा कोण आहे तो?
या भारतीय गोलंदाजांने एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स घेण्याचा धमाका केलाय. पाहा व्हीडियो.
नवी दिल्ली | सय्यद मुश्ताक अली 2021-22 सुरु असलेल्या स्पर्धेत आतापर्यंत अनेक फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. विदर्भाच्या दर्शन नलकांडेने दुसऱ्या उपांत्य सामन्यात कारनामा केला आहे. दर्शनने कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात फलंदाजांना जेरीस आणलं. दर्शनने कर्नाटक विरुद्धच्या या सामन्यात हॅट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स घेतल्या. (Syed Mushtaq Ali Trophy 2021 22 Semifinals 2 vidarbha bolwer darshan nalkande take 4 wickets in consecutively 4 bolws in 20 over against karnataka at Arun Jaitley Stadium Delhi)
दर्शनने कर्नाटकच्या डावातील 20 व्या आणि आपल्या स्पेलमधील 4 ओव्हरमध्ये हा अद्भूत कारनामा केला. दर्शनने अनिरुद्ध जोशी, शरथ बीआर, जे सुचिथ आणि अभिनव मनोहर या चौकडीला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. दर्शनने 4 ओव्हरमध्ये 7च्या इकॉनॉमीने 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
एकाच स्पर्धेत विदर्भाकडून दुसऱ्यांदा हॅट्रिक
दरम्यान दर्शन हा एकाच स्पर्धेत हॅट्रिक घेणारा विदर्भाचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी विदर्भाकडून अक्षय कर्नेवारने हा कारनामा केला होता. 9 नोव्हेंबरला सिक्कीम विरुद्ध विदर्भ यांच्यात सामना खेळवण्यात आला.
अक्षयने या सामन्यातील सिक्कीमच्या डावातील 8 व्या ओव्हरमध्ये आणि 10ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेत हॅट्रिक पूर्ण केली होती. अक्षयने 8 व्या ओव्हरच्या 5 व्या आणि 6 व्या चेंडूवर अनुक्रमे कोडाना कार्तिक आणि क्रांथी कुमार या दोघांना आऊट केलं. त्यानंतर 10 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आशिष थापाला आऊट करत हॅट्रिक पूर्ण केली.
4 चेंडूत 4 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय
दर्शन 4 चेंडूत 4 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी 2 वर्षांपूर्वी कर्नाटकाच्या अभिमन्यू मिथुनने 2019 मध्ये हरयाणा विरुद्ध ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे मिथुनने हा कारनामा सेमी फायनल सामन्यात 20 व्या ओव्हरमध्येच केला होता.
दर्शन नळकांडेच्या 4 चेंडूत 4 विकेट्स