Syed Mushtaq Ali Trophy : मुंबई संघाला मोठा धक्का, चार खेळाडू कोरोनाबाधित
चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे बायो बबलच्या नियमांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे
मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्राफी स्पर्धेआधी (Syed Mushtaq Ali Trophy) मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई संघातील (Mumbai Team) चार खेळाडूंना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याचं समोर आलं आहे. सरफराज खान (Sarfaraz Khan), प्रशांत सोळंकी (Prashant Solanki), शम्स मुलानी (Shams Mulani) आणि साईराज पाटील (Sairaj Patil) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्याऐवजी चार नविन खेळाडूंना संघात संधी देण्यात आल्याचं मुंबई क्रिेकेट असोसिएशनने सांगितलं आहे.
कोरोना बाधित चारही खेळाडूंना घरी पाठवण्यात आलं असून सात दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे. चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एमसीएबाबत आणि बायो बबलच्या नियमांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
अजिंक्य रहाणेच्या (Ajinkay Rahane) नेतृत्वात आज मुंबईचा संघ गुवाहाटीला रवाना झाला. त्याआधी करण्यात आलेल्या चाचणीत चार खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळले. 4 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत मुंबईचा ग्रुप बी मध्ये समावेश आहे. मुंबई संघ लीगमधले सर्व गुवाहाटीला खेळणार असून पहिला सामना कर्नाटकशी रंगणार आहे.
सय्यद मुश्ताक अशी टी20 ट्रॉफी स्पर्धेत अजिंक्य रहाणे मुंबईचा कर्णधार असेल, तर पृथ्वी शॉ संघाचा उपकर्णधार आहे.
मुंबईचा क्रिकेट संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ (उप कर्णधार), आदित्य तारे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, हार्दिक तमोरे, मोहित अवस्थी, सिद्धेश लाड, अमन खान, अरमान जाफर, यशस्वी जयसवाल, तनुश कोटियन, दीपक शेट्टी आणि रोयस्तान डियास.