मुंबई : टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) खेळतेय, तर देशांतर्गत सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळवली जात आहे. जसं टीम इंडियाचे खेळाडू वॉर्म अप मॅचमध्ये उत्कृष्ट खेळ करत आहेत, तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत (Syed Mushtaq Ali Trophy) देखील भारताचे अनेक खेळाडू उत्कृष्ट परफॉर्मन्स देत आहेत. या देशांतर्गत खेळाडूंमध्ये आता पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि उमरान मलिक (Umran Malik) यांसारख्या खेळाडूंची नावे चर्चेत आहे. यात सर्वाधित चर्चा उमरान मलिकची होतेय. तसेच उमरान मलिकचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) धुमाकूळ घालताना दिसत आहे. जम्मू-काश्‍मीरकडून खेळताना त्याने प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांच्या दांड्या गुल करायला सुरुवात केली आहे. उमरानने गेल्या चार सामन्यांत आपल्या भेदक गोलंदाजीने 6 विकेटस घेतल्या आहेत. 


व्हिडिओत काय? 


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) एका सामन्यात त्याने एका खेळाडूला क्लिन बोल्ड केला. हा बॉल त्याने इतका फास्ट टाकला  होता की,अक्षरश स्टम्प खूप उंचावर उडाला होता.रविवारी उमरानने (Umran Malik) त्याच्या बॉलिंगचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. उमरानच्या गोलंदाजीचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला. यासोबतच त्याने या व्हिडिओमध्ये त्याच्या फिटनेससाठी जीममध्ये घेतलेल्या मेहनतीचे दृश्यही दाखवले आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला गेला. महाराष्ट्र विरुद्ध गोलंदाजी करताना उमरानने (Umran Malik) ऋतुराज गायकवाड, पवन शहा, दिव्यांग हिंगणेकर आणि शमशुजामा काझी या फलंदाजांच्या विकेट घेतल्या होत्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Umran Malik (@umran_malik_1)


किती वेगाने बॉलिंग टाकतो? 


आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना (Umran Malik) उमरानने 150 किमी प्रतितास वेग ओलांडला आहे, यावर्षी 156.9 किमी प्रतितास हा सर्वोच्च वेग त्याचा होता. त्याने अलीकडे न्यूझीलंड अ संघाविरुद्धही चांगली कामगिरी केली. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये त्याला नेट गोलंदाज म्हणून नाव देण्यात आले होते. परंतु व्हिसा विलंबानंतर, बोर्डाने निर्णय घेतला की त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy), प्रमुख देशांतर्गत T20 स्पर्धा खेळण्यासाठी कायम ठेवण्यात येईल.