शारजाह : टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सनं पखतून्सपुढे १४१ रनचं आव्हान ठेवलं आहे. या मॅचमध्ये पखतून्सनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. नॉर्थन वॉरियर्सनं १० ओव्हरमध्ये १४०/३ एवढा स्कोअर केला. नॉर्थन वॉरियर्सकडून रोवमॅन पॉवेलनं २५ बॉलमध्ये सर्वाधिक नाबाद ६१ रन केले. पॉवेलच्या इनिंगमध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. नॉर्थन वॉरियर्सचा कर्णधार डॅरेन सॅमीनं ९ बॉलमध्ये नाबाद १४ रन केले. आंद्रे रसेलनं १२ बॉलमध्ये ३८, निकोलास पूरननं १० बॉलमध्ये १८ आणि लेंडल सिमन्सनं ४ बॉलमध्ये ५ रन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पखतून्सकडून कर्णधार शाहिद आफ्रिदी, मोहम्मद इरफान आणि शरफुद्दीन अश्रफ यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.


मागच्यावर्षी सुरु झालेली टी-१० सुपर लीग क्रिकेटमधला नवा फॉरमॅट आहे. या स्पर्धेत दोन्ही टीममध्ये १०-१० ओव्हरची मॅच होते. ही मॅच फक्त दीड तास चालते. मागच्यावर्षी शारजाहमध्ये ६ टीममध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. दुसऱ्या वर्षी टी-१० लीगमध्ये ८ टीम सहभागी झाल्या आहेत. आयोजकांनी यावर्षी स्पर्धेत भाग घेतलेल्या टीमची फी ४,००,००० डॉलरऐवजी १.२ मिलियन डॉलर केली होती.


२३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेची फायनल आता नॉर्थन वॉरियर्स आणि पखतून्समध्ये होणार आहे. पखतून्सनं पहिल्या क्वालिफायरमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. तर नॉर्थन वॉरियर्सनं क्वालिफायर-२ आणि क्वालिफायर-३चे विजेते मराठा अरेबियन्सचाला हरवून एलिमिनेटरमध्ये जागा बनवली. त्याआधी मराठा अरेबियन्सनं बंगाल टायगर्सना ७ विकेटनं हरवून एलिमिनेटरमध्ये प्रवेश केला होता.


टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमात नॉर्थन वॉरियर्सचं टायटल स्पॉन्सर ZEE5 आहे. यावर्षी टी-१० क्रिकेट लीगमध्ये नव्यानं सामील झालेल्या ३ टीमपैकी नॉर्थन वॉरियर्स ही एक टीम आहे. ZEE5 झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा एक ग्लोबल डिजीटल एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. काही कालावधीपूर्वी ZEE5 १९० पेक्षा जास्त देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.