बंगळुरुने हैदराबादचा पराभव करत टी-२०तील आव्हान राखलं कायम
बंगळुरुनं बलाढ्य हैदराबादचा पराभव करत टी-२० स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलंय..
मुंबई : बंगळुरुनं बलाढ्य हैदराबादचा पराभव करत टी-२० स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलंय. विराट कोहलीच्या संघानं हैदराबादवर १४ धावांनी मात केली. ६९ धावांची स्फोटक खेळी करणारा आणि टी-२० स्पर्धेतील सर्वोत्तम झेल पकडणारा एबी डिव्हिलियर्स सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.
बंगळुरुनं पहिल्यांदा फलंदाजी करत ६ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्सच्या अर्धशतकामुळे तसंच मोईन अलीच्या ६५ धावांमुळे आणि ग्रंधोमेमच्या स्फोटक ४० धावांमुळे बंगळुरुला २१८ धावांपर्यंत मजल मारता आली. २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून कर्णधार केन विल्यम्सननं ८१ धावा आणि मनिष पांडेनं ६२ धावा केल्या. मात्र, त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.