दुबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 जिंकत ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने कारनामा केला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये फलंदाजांनी धावांचा पाऊस पडला. तर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला. या स्पर्धेत सर्वाधिक सिक्स-फोर कोणत्या टीमने मारले, सर्वाधिक धावा तसेच विकेट्स कोणी घेतल्या, यासह अनेक आकडे आपण जाणून घेणार आहोत. (T 20 World cup 2021 see most runs sixes wickets biggest score see full list)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज 


बाबर आझम - 303 


डेव्हिड वॉर्नर - 289


मोहम्मद रिझवान - 281


जॉस बटलर - 269


सी असालंका - 231


सर्वाधिक विकेट्स घेणारे पहिले 5 बॉलर्स


वानिंदु हसारंगा - 16


एडम झॅम्पा - 13


ट्रेन्ट बोल्ट - 13


जोश हेझलवूड - 11


शाकिब अल हसन - 11


इतर आकडेवारी


स्पर्धेतील एकूण सिक्स - 405. 


सर्वाधिक सिक्स - जॉस बटलर 13.


एका डावात सर्वाधिक धावा- जॉस बटलर- 101.


वेगवान अर्धशतक -शोएब मलिक- 18 बॉल. 


सर्वाधिक अर्धशतक - बाबर आझम - 4. 


सर्वाधिक निर्धाव षटकं - शाहिन आफ्रिदी - 2.


सर्वाधिक डॉट बॉल - टीम साऊथी - 85.


एका डावात सर्वाधिक धावा करणारी टीम - भारत 210-2. 


एका सामन्यात सर्वाधिक धावा - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 368 धावा. 


सर्वाधिक विजय - ऑस्ट्रेलिया - 7 सामने आणि 6 विजय.  


सर्वाधिक पराभव - बांगलादेश - 8 सामने आणि 6 पराभव.


फायनलमध्ये सर्वाधिक धावा - 173, ऑस्ट्रेलिया.