मुंबई : टीम इंडियासाठी (Indian Cricket Team) अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 (T 20 World Cup 2022) स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडला आहे. बीसीसीआयने (Bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अनेक दिवसांपासून बुमराह कमबॅक करेल असा आशावाद सर्वांना होता. मात्र अखेर होती नव्हती ती आशाही आता धुळीस मिळाली आहे. दरम्यान आता बुमराहच्या जागी कुणाला संधी मिळणार, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे. बुमराहच्या जागी टीम इंडियामध्ये कोण खेळणार, याबाबतची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
(t 20 world cup 2022 bcci will be naming a replacement for jasprit bumrah in squad for the marquee tournament soon) 


बीसीसीआयने काय म्हटलंय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआय लवकरच महत्त्वाच्या स्पर्धेत बुमराहच्या जागी कुणाला संधी देणार याची घोषणा करणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिली आहे. वर्ल्ड कपसाठीच्या राखीव खेळाडूंमध्ये  मोहम्मद शमी आणि दीपक चहर या दोघांचा समावेश आहे. 


तर 'जम्मू एक्सप्रेस' उमरान मलिकची निवड होऊ शकते, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे बीसीसीआय राखीव खेळाडूंमधून शमी आणि चहरला संधी देणार की युवा उमरानला संधी देणार की आणखी कुणाला चान्स देणार, याबाबत सर्वांनाच उत्सूकता लागून राहिली आहे. 


T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया- 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, बी. कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.


स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर