मेलबर्न : टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) रविवारी महामुकाबला होणार आहे. या सामन्यात 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात 23 ऑक्टोबरला मेलबर्नला सामना रंगणार आहे. या सामन्याआधी टी 20 वर्ल्ड  कपमध्ये दोन्ही टीम किती वेळा आमनेसामने आले आहेत, सर्वाधिक वेळा कुणाचा विजय झालाय, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (t 20 world cup 2022 ind vs pak  head to head records)


आकडेवारी कुणाच्या बाजुने? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाक हे दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 6 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवलाय. तर पाकिस्तानला एकच सामना जिंकता आला आहे. तर हे दोन्ही संघ टी 20 क्रिकेटमध्ये 13 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने 8 वेळा पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली आहे. तर पाकिस्तानने 3 वेळा विजय मिळवला आहे.    


पाकिस्तान स्क्वॉड


बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदरी अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शान मसूद आणि उस्मान कादिर. 


वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया


 रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह.