Blind T20 World Cup 2022: भारतात 5 डिसेंबर 2022 पासून अंधांच्या तिसऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट (India Blind  T20 World Cup cricket) स्पर्धेला सुरुवात झाली.  कटक येथील बाराबती स्टेडियमवर अंधांच्या तिसऱ्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 4 गडी गमावून 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 13.1 षटकात 3 गडी गमावून 167 धावा करत सामना जिंकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेतील अंतिम सामना 17 डिसेंबर 2022 रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन देशातील आठ राज्यांत सुरू असून महाराष्ट्रात यामधील दोन सामने येत्या शनिवारी (10 डिसेंबर) आणि रविवारी (11 डिसेंबर) खेळले जातील. तसेच भारताने नाणेफेक जिंकली त्यानंतर कर्णधार अजय कुमार रेड्डीचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरला आहे. बांगलादेशचे सलामीवीर सलमान आणि आबिद यांना तीन षटकांत बाद करून भारताने धडाकेबाज सुरुवात केली. बांगलादेशचा कर्णधार मोहम्मद आशिकुर रहमान आणि मोहम्मद आरिफ यांनी आपल्या संघाचा डाव सांभाळला.   


वाचा: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का? 


तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी


दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावा जोडल्या. ही भागीदारी 13व्या षटकात एका चेंडूत 33 धावा करून आरिफ धावबाद झाल्यावर तुटली. त्यानंतर आशिकुर रहमानने तंझिलसोबत मिळून संघाचा स्कोअर बोर्ड पुढे नेला. या जोडीने डावाच्या शेवटपर्यंत फलंदाजी करताना 61 धावांच्या भागीदारीसह एकूण 166 धावा केल्या.


आशिकुर रहमान 53 चेंडूत 75 धावा करून डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. तंझिल 20 धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात भारताचे सलामीवीर टी दुर्गा राव आणि नकुल बदनाईक यांनी दमदार सुरुवात करून 8.3 षटकात 95 धावा केल्या.


भारताने 13.1 षटकात विजय मिळवला


24 चेंडूत 36 धावा करून नकुल बाद झाला. दुर्गा राव (73) याने वेगवान धावा सुरूच ठेवल्या. 12व्या षटकात तो निवृत्त झाला तेव्हा भारत लक्ष्यापासून अवघ्या 15 धावा दूर होता. कर्णधार अजय कुमार रेड्डी आणि सुनील रमेश यांनी कोणताही त्रास न होता सामना 13.1 षटकांत पूर्ण केला. 


दरम्यान या सामन्यांच्या आयोजनाचे धनुष्य क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र म्हणजेच सीएबीएम यांनी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पेललं आहे. वरील दोन्ही सामन्यांचे आयोजन मुंबई क्रिकेट संघटना म्हणजेच एमसीएनं कांदिवलीच्या महावीर नगर येथील मैदानावर होणार आहे. हे सामने सकाळच्या सत्रात 9.30 ते दुपारी 1.30 च्या दरम्यान खेळले जातील.'एमसीए'ने  हे मैदान निःशुल्क उपलब्ध करून दिल्यानं 'सीएबीएम'नं त्यांचे आभार मानले. भारतीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक दिनेश लाड, क्रिकेटपटू पॉल वल्थाटी, पय्याडे स्पोर्ट्स क्लबचे डॉ. पी.व्ही.शेट्टी आणि हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रिकब जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.