क्रिकेटमध्ये रोज नवे रेकॉर्ड्स नोंदवले जातात. जेव्हा एखादा रेकॉर्ड रचला जातो, तेव्हा भविष्यात तो मोडला जाईल की नाही याबाबत क्रिकेट चाहत्यांना नेहमी शंका असते. पण अशावेळी एखादा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांच्या भुवया उंचावतो आणि नवा रेकॉर्ड नोंदवतो. असाच एक रेकॉर्ड 17 वर्षाच्या महिला गोलंदाजाने रचला आहे. इंडोनेशियाच्या या खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये एकही धाव न देता 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड असून, टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडोनेशियाच्या रोहमालियाने आपल्या पहिल्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिने एकही धाव न देता एकूण 7 विकेट्स घेतले. म्हणजेच तिने 7 फलंदाजांना शून्यावर तंबूत धाडलं. पुरुष आणि महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. आजपर्यंत एकही गोलंदाज ही कामगिरी करु शकलेला नाही. 


बालीमध्ये मंगोलियाविरोधातील द्विपक्षीय मालिकेच्या पाचव्या सामन्यात फिरकी गोलंदाज रोहमालियाने 20 चेंडू फेकले. यातील एकाही चेंडूवर तिने धाव दिली नाही. पण तिने यातील 7 चेंडूंवर विकेट्स घेतले. अर्जेंटिनाची एलिसन स्टॉक्स (3 धावांवर 7 विकेट्स), नेदरलँडची फ्रेडरिक ओवरडिज्क (3 धावांवर 7 विकेट्स) यानंतर आता रोहमालिया 7 विकेट घेणारी तिसरी फलंदाज आहे. 



24 एप्रिलला खेळण्यात आलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात इंडोनेशियाने 151 धावा केल्या होत्या. यानंतर इंडोनेशियाच्या गोलंदाजांनी मंगोलियाला 24 धावांवर बाद केलं. ही मालिका इंडोनेशियाने 6-0 ने जिंकली. 


टी-20 मध्ये सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचा रेकॉर्ड काय?


पुरुषांच्या टी-20 मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा रेकॉर्ड मलेशियाच्या सयाजरुल एजात इद्रसच्या नावावर आहे. त्याने चीनविरोधात 8 धावा देत 7 विकेट्स घेतले होते. 26 जुलै 2023 ला हा सामना खेळवण्यात आला होता. सयाजरुलच्या गोलंदाजीच्या जोरावर मलेशियाने चीनच्या संघाला 11.2 ओव्हर्समध्ये 23 धावांवर ऑल आऊट केलं होतं. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. 


आयसीसी सदस्य संघांमध्ये दीपक चहरच्या नावे रेकॉर्ड


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सदस्य असणाऱ्या देशांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा रेकॉर्ड भारताच्या दीपक चहरच्या नावे आहे. 2019 मध्ये बांगलादेशविरोधात त्याने 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.