Australia vs Sri Lanka T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यातल्या पहिल्या डावातील पाचव्या षटकातील एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मिशेल स्टार्क फलंदाज धनंजय डिसिल्वाला नॉन स्ट्रायकर एंडला वॉर्निंग देताना दिसत आहे. पाचव्या षटकातील चौथा चेंडू टाकताना स्टार्कने धनंजयला वॉर्निंग दिली. त्यावेळेस श्रीलंकेच्या 1 विकेट गमवून 24 धावा झाल्या होत्या. धनंजय डिसिल्वासोबत कुसल मेंडिस मैदानात खेळत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल फोटोत स्टार्क धनंजय डिसिल्वाला इशारा देताना दिसत आहे. चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज सोडण्यावरून वॉर्निंग दिली. स्टार्कने एकदा नाही तर दोन डिसिल्वा क्रीज सोडण्यावरून इशारा दिला. पण मंकडिंग केलं नाही. धनंजयनं 23 चेंडूत 26 धावा केल्या. या खेळीत 3 चौकारांचा समावेश आहे. अशटोन अगरच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नरनं त्याचा झेल घेतला.




इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्टार्कने बटलरला इशारा दिला होता. चेंडू टाकण्यापूर्वीच बटलरने क्रीज सोडलं होतं. तेव्हा स्टार्कने त्याला असं करू नये, असा इशारा दिला होता. तसेच, मी दीप्ती नाही, पण मी हे करू शकतो, असे बोल स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झालं होतं.