T20 WC 2022 Group Stage A: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील ग्रुप स्टेज ए फेरीतील अंतिम सामना नेदरलँड विरुद्ध श्रीलंका (Netherland Vs Sri Lanka) आणि नामिबिया विरुद्ध यूएई (Namibia Vs UAE) यांच्यात होणार आहे. या सामन्यातील स्थितीवर सुपर 12 फेरीतील (Super 12)दोन संघांचं स्थान निश्चित होणार आहे. यामध्ये नेदरलँडचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. पण उर्वरित सामन्यात मोठा उलटफेर झाल्यास कोणता संघ सुपर 12 फेरीत स्थान मिळवेल सांगता येत नाही. पहिल्याच सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे श्रीलंकेला चांगल्या रनरेटसह सामना जिंकणं आवश्यक आहे. गुणतालिकेत नेदरलँडचा दोन विजय आणि 4 गुणांसह +0.149 रनरेट आहे. तर नामिबियाने दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवत 2 गुणांसह +1.277 रनरेट असल्याने दुसऱ्या स्थानी आहे. तर श्रीलंका दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवत 2 गुणांसह +0.600 रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर यूएई संघ सलग दोन पराभवामुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका कोणत्याही अडचणीशिवाय सुपर 12 अशी अपेक्षा परंतु नामिबियाकडून झालेल्या मोठ्या पराभवामुळे रनरेटवर परिणाम झाला. यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं यूएईला 79 धावांनी पराभूत करून आपला रनरेट सुधारला. पण असं असलं तरी श्रीलंकेला नेदरलँड्सवर विजय मिळवावा लागेल. तसे झाल्यास नामिबिया आणि यूएई यांच्यातील सामन्याने फरक पडणार नाही. मात्र, तो सामना गमावल्यास यूएईसाठी प्रार्थना करावी लागेल. कारण यूएईने नामिबियाला पराभूत केल्यास सुपर 12 जाण्याची संधी असेल. श्रीलंका नेदरलँड्सकडून एका धावेने पराभूत झाल्यास यूएईला नामिबियाला 29 धावांनी पराभूत करावे लागेल. पावसामुळे दोन्ही सामने रद्द झाल्यास श्रीलंकेच्या सुपर 12 फेरीतील आशा संपुष्टात येतील.


टी 20 वर्ल्डकप 2022 ग्रुप स्टेज ए
संघ  सामना  विजय  पराभव  धावगती  गुण
नेदरलँड 2 2 0 +0.149 4
नामिबिया 2 1 1 +1.277 2
श्रीलंका 2 1 1 +0.600 2
यूएई 2 0 2 -2.028 0

T20 WC 2022: "जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर..." कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ


टी 20 वर्ल्डकप ग्रुप स्टेज A


  • नेदरलँड विरुद्ध श्रीलंका- 20 ऑक्टोबर, सकाळी 9.30 वाजता

  • नामिबिया विरुद्ध यूएई-20 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता