T20 WC : खेळाडूकडून लैंगिक अत्याचार करत महिलेचा...; धक्कादायक माहिती उघड...
Cricketer Arrested : क्रिकेट विश्वाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. T20 च्या खेळाडूने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत (Arrested in sexual assault case) असलेल्या खेळाडूबद्दल धक्कादायक खुलासे होतात आहे.
Danushka Gunathilaka choked Sydney Woman : क्रिकेट विश्वाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. T20 च्या खेळाडूने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत (Arrested in sexual assault case) असलेल्या खेळाडूबद्दल धक्कादायक खुलासे होतात आहे. मिळालेल्या माहितीनुसार खेळाडूने बलात्कारादरम्यान महिलेचा गळा आवळाला होता. त्यामुळे महिलेला रुग्णालयात जावं लागलं होतं. या घटनेनंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे.
क्रिकेट विश्वाला काळीमा फासणारी घटना
श्रीलंकेचा (sri lanka) फलंदाज दानुष्का गुनाथिलकाच्या (Danushka Gunathilaka) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होते आहे. ऑस्ट्रेलियात (Australia)महिलेसोबत लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. दुनष्काला T20 विश्वचषक-2022 (T20 World Cup-2022) दरम्यान सिडनीतील हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होतं आहेत. समाचार एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार दानुष्काने महिलेसोबत बलात्कार करताना अतिशय वाईट प्रकारे तिचा गळा आवळला होता. त्यामुळे महिलेचं ब्रेन स्कॅन करावं लागलं होतं. दरम्यान लैंगिक छळाच्या आरोपानंतर गुणतिलकावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली आहे. (T20 WC Danushka Gunathilaka rape choked Sydney Woman nmp)
29 वर्षीय महिलेने केली तक्रार
गुणतिलकाच्या विरोधात 29 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुणतिलका आणि पीडित महिलेची ओळख एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.