दुबई: श्रीलंका विरुद्ध बांग्लदेश झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या सामन्यामध्ये वाद झाला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारचा आक्रमक अंदाज यावेळी सर्वांना मैदानात पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाहिरूने त्याच्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर थ्रो टाकला, ज्यावर मोहम्मद नईम थोडक्यात बचावला. चेंडू नईमच्या हेल्मेटवर गेला. बांगलादेशचा हा फलंदाज खाली बसला नसता तर चेंडू त्याच्यावर आदळू शकला असता. यानंतर त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर लाहिरूने लिटन दासला आऊट केलं. 


लिटन दास पॅव्हेलियनमध्ये परतत होता त्याच वेळी लाहिरू बोलण्यासाठी त्याच्याकडे गेला. त्यानंतर त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला. तिथे बाचाबाची झाली. इतकच नाही तर शिवीगाळही करण्यात आला. या प्रकरणात पंचाना हस्तक्षेप करावा लागला. 


श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात अनेकदा चुरशीची स्पर्धा असते. या T20 विश्वचषकात दोन्ही संघांनी पहिल्या फेरीत चांगली कामगिरी करत सुपर-12 मध्ये स्थान मिळवले. श्रीलंका संघाने चौथ्यांदा विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. श्रीलंकेनं बांग्लादेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.