शारजाह : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद नबीने स्कॉटलंडविरुद्ध अफगाणिस्तान संघाच्या विजयानंतर स्वतःची खिल्ली उडवली. सोमवारी शारजाह येथे झालेल्या T20 वर्ल्ड कप 2021 सामन्यात अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा 130 धावांनी पराभव केला. यासंदर्भात जेव्हा प्रेस कॉन्फर्नस झाली, तेव्हा मोहमद नाबीने या सामन्याबद्दल वक्तव्य केलं आणि हे त्याच्यासाठी हे खूप कठीण कामं असल्याचे सांगताना त्याने स्वत:चीच खिल्ली उडवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार मोहम्मद नबी प्रेस कॉन्फर्नसमध्ये आल्या आल्या म्हणाला, 'की हे सर्वात कठीण काम आहे खरंच.' यानंतर जेव्हा त्याने पुढे बोलायला सुरूवात केली तेव्हा तेव्हा त्याचे शब्द ऐकून तुम्हाला तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि नेटकरी देखील स्वत:ला या व्हिडीओला शेअर करण्यापासून रोखू शकत नाहीत. इतका हा मजेदार व्हिडीओ आहे.


त्याने बसल्यावरती विचारे की, तुमच्याकडे किती प्रश्न आहेत? कारण माझे इंग्रजी पाच मिनिटांतच संपेल. त्याचे हे शब्द आणि त्याची बोलण्याची पद्धत तुम्हाला पोट धरुन हसायला भाग पाडेल.


जेव्हा मॅटपूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्रगीत लावले होते तेव्हा नबी भावूक झाला होता. त्याला आपले अश्रू अनावर झाले होते. आयसीसी टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी रशीद खानने संघ सोडला आणि त्याने संघ सोडाता कारण सांगितले की, संघ निवडताना त्याचे मत विचारात घेण्यात आले नाही, ज्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर नबीला कर्णधार बनवण्यात आले. त्याने यापूर्वी देखील अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे.



अफगाणिस्तानने नजीबुल्ला झद्रानच्या 34 चेंडूत 59, हजरतुल्ला झाझाईच्या 30 चेंडूत 44 आणि रहमानउल्ला गुरबाजच्या 37 चेंडूत 46 धावांच्या जोरावर 4 बाद 190 धावा केल्या. त्यानंतर त्यांनी स्कॉटलंडला 10 ओव्हरमध्ये 60 धावांत गुंडाळले.


मुजीब उर रहमानने टी20 विश्वचषक पदार्पणातच पाच विकेट घेतल्या. त्याने फक्त 20 धावा दिल्या. दुसरीकडे राशिद खानने 9 धावांत चार बळी घेतले. अफगाणिस्तानचा पुढचा सामना 29 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे.