T20 World Cup आधी टीम इंडियात मोठे बदल? 4 खेळाडूंवर टांगती तलवार
T20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का, हार्दिक पांड्या पाठोपाठ आणखी 3 खेळाडूंचं टेन्शन वाढणार?
मुंबई: IPL 2021चे सामने शेवटच्या टप्प्यात आले आहेत. तर दुसरीकडे टी 20 वर्ल्ड कप जवळ येत असल्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामना हातून गमवल्यानंतर आता टी 20 वर्ल्ड कप टीम इंडियासाठी जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोहली कर्णधार असताना टीम इंडिया एकही ट्रॉफी आतापर्यंत जिंकू शकली नाही. तर कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप असणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा 8 सप्टेंबरलाच झाली होती. IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील काही खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे निवडकर्त्यांना संघात बदल करण्यास भाग पाडले आहे. ICCच्या नियमांनुसार सर्व देश 10 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करू शकतात. म्हणजेच बीसीसीआयकडे आता थोडाच वेळ शिल्लक आहे. टी 20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
विराट कोहलीने टी 20 फॉरमॅटमधून कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली होती. त्याने ट्वीट करून ही माहिती दिली होती. टी 20 वर्ल्ड कप 2021 UAE मध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
याआधीही टी -20 वर्ल्ड कपमध्ये निवड झालेला लेगस्पिनर वरुण चक्रवर्तीच्या गुडघ्यामध्ये पुन्हा एकदा दुखापत सुरू झाली आहे. BCCI च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरुण चक्रवर्तीची गुडघेदुखी पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. वरुणच्या गुडघ्यात पुन्हा वेदना होत आहेत.
ICCच्या नियमांनुसार, भारताला अजूनही 10 ऑक्टोबरपर्यंत टी -20 वर्ल्ड कप संघात बदल करण्याची संधी आहे. वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे टी -20 वर्ल्ड कपच्या संघातून त्याला वगळलं जाण्याची शक्यता आहे. तर त्याच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला टी -20 वर्ल्ड कप संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्या फिटही नाही आणि फॉर्ममध्ये देखील नाही. त्यामुळे त्याची टीम इंडियातील जागा धोक्या आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारवरही टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आता 10 ऑक्टोबरपर्यंत संघात कोणते बदल होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.