मुंबई : T20 विश्वचषक भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक वाईट आठवणी देऊन गेला आहे. रविवारी न्यूझीलंडच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघावर विजय मिळवला आणि तिथे भारतीय क्रिकेट संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. (Virat Kohli T20)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज (सोमवारी) भारत आणि नामिबिया या संघांमध्ये औपचारिकता म्हणून एक सामना होणार आहे. विराट कोहली याचा संघाचा टी20 कर्णधार म्हणून हा अखेरचा सामना असणार आहे. टी20 विश्वचषकानंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगणाऱ्या विराटचा हा अखेरचा सामना असेल. 


यंदाच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाची सुरुवातच पराभवानं झाली होती. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघाकडून भारताला पराभव पाहायला मिळाला होता. यानंतर न्युझीलंडसोबतही संघाच्या वाट्याला पराभवच आला. 


एकिकडे विराटनं टी20 सामन्यांसाठीचं कर्णधारपद गमावलेलं असतानाच दुसरीकडे त्याच्या हातातून एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपदही गमावलं जाऊ शकतं अशी चिन्हं दिसत आहेत. 


2023 क्रिकेट विश्वचषकाच्या अनुषंगानं अता BCCI ला संघासाठी नव्या कर्णधाराचा शोध आतापासून सुरु करावा लागू शकतो. त्या विश्वचषकापर्यंत विराटचं वय 34-35 वर्षे इतकं असेल. 


विराटच्या नावाभोवती आता अनिश्चिततेचं वलय निर्माण झालेलं असतानाच काही खेळाडूंकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यामध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, के.एल.राहुल आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंची नावं पुढे येत आहेत.