5 वर्षांनंतर T20 World Cup स्पर्धा, जाणून घ्या क्रिकेटच्या `रन`संग्रामाबाबत सर्व काही
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (ICC T20 World Cup 2021) आजपासून (17 ऑक्टोबर) क्रिकेटच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली.
यूएई : कोरोनाच्या कोपानंतर अखेर आजपासून (17 ऑक्टोबर) क्रिकेटच्या रनसंग्रामाला म्हणजेच टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (ICC T20 World Cup 2021) सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 16 संघ झगमगत्या ट्रॉफीसाठी झुंज देणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएई (UAE) आणि ओमान (Oman) आणि यूएईमध्ये करण्यात आलंय. मात्र तरीही यजमानपद हे भारताकडेच (BCCI) आहे. विशेष म्हणजे 5 वर्षानंतर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. (T20 World Cup 2021 What will be the outcome of the match if the Super Over is tied)
5 वर्षानंतर टी 20 वर्ल्ड कप
नियमांनुसार दर 4 वर्षांनंतर आयसीसी या स्पर्धेचं आयोजन करतं. मात्र कोरोनामुळे (Coronavirus Pandemic) वर्ल्ड कपच्या आयोजनला 1 वर्ष विलंब झाला. अखेरच्या टी 20 स्पर्धेचं आयोजन हे 2016 मध्ये करण्यात आलं होतं. हा वर्ल्ड कप वेस्टइंडिजने जिंकला होता.
पहिल्यांदाच DRS चा वापर
या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेपासून पहिल्यांदाच DRS चा वापर करण्यात येणार आहे. आयसीसीने यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार, सामन्यादरम्यान दोन्ही संघांना प्रत्येकी 2 रिव्ह्यू मिळणार आहे. गत टी 20 स्पर्धेत या पद्धतीचा वापर केला जात नव्हता. कारण तेव्हा टी 20 क्रिकेटमध्ये डीआरएसचा उपयोग केला जात नव्हता.
असं आहे पॉइंट्स टेबलचा नियम?
स्पर्धेतील विजयी संघाला सामना जिंकल्यास 2 पॉइंट्स मिळतील. पराभूत संघाला पॉइंट्स मिळणार नाहीत. सामना टाय झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 पॉइंट मिळेल. जर एकाच ग्रृपमधील दोन्ही टीमचे पॉइंट्स समान असल्यास, नेट रन रेट आणि हेड टु हेड रेकॉर्ड या निकाषानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.
साखळी फेरीतील सामना टाय झाल्यास काय?
मॅच टाय झाल्यास, विजेता संघ हा सुपर ओव्हरने ठरवण्यात येईल. सुपर ओव्हर टाय झाल्यास, आणखी एक सुपर ओव्हर खेळवली जाईल. खराब वातावरणामुळे जर का सुपर ओव्हर खेळवता आली नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 पॉइंट मिळेल.
बाद फेरीतील सामना टाय झाल्यास काय?
बाद फेरीतील म्हणजेच सेमी फायनलचा सामना हा बरोबरीत सुटला, तर सुपर 12 मध्ये टॉपवर असलेला पुढच्या फेरीत पोहचेल. अंतिम सामन्याचा निकाल न निघाल्यास, दोन्ही संघाना संयुक्तपणे विजेता संघ घोषित केला जाईल.
वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या मॅचेस
पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
ग्रुप स्टेजमधील क्वालिफाय टीम 1 (5 नोव्हेंबर)
ग्रुप स्टेजमधील क्वालिफाय टीम 2 (8 नोव्हेंबर)
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल.