T20 World Cup Final : फायनल पावसामुळे वाहून गेली तरी नो टेंशन... ICC चे नवे नियम ठरवणार विजेते!
Melbourne Weather Prediction: T20 विश्वचषक (T20 World Cup-2022) च्या चालू हंगामाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात हवामान विभागाने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सामन्याच्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Pakistan vs England, T20 World Cup Final : टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना (T20 World Cup Final) 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये (Melbourne) खेळवला जाणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan and England) यांच्यात हा अंतिम सामना रंगणार आहे. बाबर आझमचा (Babar Azam) कर्णधार असलेला पाकिस्तानला 2008 तर इंग्लंडला 2010 मध्ये टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा विजेतेपदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला, तर इंग्लंडने भारताचा पराभव करत फायनलचे तिकीट मिळवले. आता पाकिस्तान आणि इंग्लंडला विश्वचषक जिंकून टी 20 चे चॅम्पियन बनायचे आहे. मात्र या विजेतेपदाच्या लढतीत हवामान विभागाकडून चाहत्यांना मोठा धक्का दिला जाऊ शकतो...
पावसामुळे फायनल रद्द झाली तर? (T20 World Cup Final)
आता दोन माजी चॅम्पियन संघ अंतिम फेरीत भिडतील. पण टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup Final) अंतिम सामना पावसामुळे (rain update) रद्द झाला आणि राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषित केले जाईल. आयसीसीने असाही नियम बनवला आहे की, पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ-लुईस नियम तेव्हाच लागू होईल जेव्हा दोन्ही संघांनी त्यांच्या डावातील किमान 10-10 षटके खेळली असतील.
वाचा : महागाईचे चटके; डाळ- भात खाण्यापूर्वीही विचार करावा लागणार?
13 नोव्हेंबरला जोरदार पावसाची शक्यता
सामन्याच्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला पाऊस आणि खराब हवामानाचा (heavy rain update) अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढेच नाही तर अंतिम सामना पावसात वाहून जाऊ शकतो. मात्र यासाठी राखीव दिवस (reserve day) निश्चित करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सामन्याच्या दिवशी पावसाची 60 टक्के शक्यता आहे. ज्या वेळी सामना संध्याकाळी सुरू होणार आहे. त्या वेळी 57 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय ताशी 16 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ( Meteorological Department) सोमवारी म्हणजेच राखीव दिवशीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या दिवशी, मेलबर्नमध्ये पाऊस पडण्याची 80 टक्के शक्यता आहे. राखीव दिवसातही निकाल न लागल्यास इंग्लंड आणि पाकिस्तानला संयुक्त विजेता घोषित केले जाईल.