T20 World Cup 2022 Hardik Pandya: टी 20 वर्ल्डकप जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारापैकी एक आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या आशा वाढल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडून (Hardik Pandya) सर्वात जास्त अपेक्षा आहेत. कारण गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही हार्दिक पांड्या उजवा आहे. आता हार्दिक पांड्यानं या वर्षासाठी आपलं लक्ष्य निश्चित केलं आहे. टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धा आणि उर्वरित दोन महिन्यांसाठी काहीतरी खास करण्याचं ठरवलं आहे. याबाबत हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर शेअर केला आहे. यात क्षेत्ररक्षणात आपलं नाव कमवायचं आहे. त्याचबरोबर सर्वोत्तम कॅच घेण्याचं ध्येय ठेवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओत हार्दिक पांड्यानं सांगितलं आहे की, 'देव माझ्यावर खूश आहे. माझा फिटनेस चांगला झाला. माझे प्रशिक्षक टी दिलीप यांच्यासोबत क्षेत्ररक्षणावर बरीच मेहनत घेतली. आता माझ्या शैलीवर काम करत आहे आणि अवघड झेल पकडत आहे. मी ज्या हार्दिकला ओळखतो तो डायव्ह करून चेंडू रोखायचा. या वर्षी माझे उद्दिष्ट एक असा झेल पकडणे आहे जो माझ्या सर्वोत्तम झेलांपैकी एक ठरेल."



T20 World Cup: टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये 'या' खेळाडूला स्थान द्या! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं केली सूचना


हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियात सहा टी-20 सामने खेळला आहे. हार्दिकने तीन डावात 39 च्या सरासरीने 78 धावा केल्या आहेत. 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 22 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या 6 सामन्यात त्याने तीन विकेट्सही घेतल्या आहेत.