T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्ध सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा युवा बॉलर अर्शदिप सिंह (Arshadeep Singh) याने पहिल्याच वर्ल्ड कपच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची विकेट घेतली आहे. या विकेटसह अर्शदिप सिंहने शानदार सुरुवात केली आहे. तसेच त्याने दुसऱ्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानला दुसरा धक्का दिला आहे.  (T20 World Cup 2022 India Vs Pakistan babar azam wicket memes on social media )


 आणखी वाचा: बायको पाकिस्तानची पण दिल है हिंदुस्थानी..ही जर्सी घालून करणार भारताला सपोर्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान बाबर आझम आऊट झाल्यांनतर सोशल मीडियावर मिम्स चा पाऊस पडायला सुरवात झालीये. सोशल मीडियावर बाबर आझम ला घेऊन #बादशाह  या नावाने जोरदार मिम्स बनायला सुरवात झाली आहे. मिम्सवर प्रेक्षकांकडून जबरस्त कॉमेंट्स करायला सुरवात झाली आहे.


 आणखी वाचा: अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल..चिमुकलीला चिरडलं आणि.. 


भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) टीम इंडियाला झोकात सुरुवात करुन दिली. भुवीने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली, तीही वाईडच्या रुपाने. पहिल्या ओव्हरमध्ये धावा न मिळाल्याने पाकिस्तानची ओपनिंग जोडी काहीशी दबावात होती. मात्र याच दबावाचा फायदा अर्शदीपने (Arshadeep Singh) घेतला. अर्शदीपने अफलातून बॉल टाकत बाबरला एलबीडबल्यू आऊट केलं. अंपायर्सनी दिलेल्या या निर्णयाला पाकिस्तानने आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानला रिव्हीव्यू गमवावा लागला.


नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानंतर बाबर आझमच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्ट दिसत होतं. "आम्हाला पहिल्यांदा गोलंदाजी करायची होती. पण नाणेफेक आमच्या हातात नाही. आम्ही आता फलंदाजी करत चांगली धावसंख्या उभारू. न्यूझीलंडसारखी खेळी करून भारताला रोखू", असं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं सांगितलं.


आता या अटीतटीच्या सामन्यात कोण विजयी होणार हे पाहणं खूप मजेशीर असणार आहे. (T20 World Cup 2022 India Vs Pakistan babar azam wicket memes on social media )