IndvsPak : भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये भारतासमोर पाकिस्तानने 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकत कर्णधार रोहित शर्माने प्रथम पाकिस्तान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारताच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. भारताकडून युवा गोलंदाज अर्शदीप सिंह आणि हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून शान मसूद आणि इप्तियार अहमद यांनी अर्धशतके केलीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पहिल्याच चेंडूवर शून्यावर  पायचीत अर्शदीपने तंबूचा मार्ग दाखवला. सलामीवीर मोहम्मद रिझवानही जास्त वेळ टिकला नाही. 4 धावांवर असताना अर्शदीपने सेट अप लावत आपल्या जाळ्यात अडकवलं. 15 धावांवर पाकिस्तानचे दोन गडी बाद झाले होते. मात्र इफ्तियार अहमद आणि शान मसूद यांनी डाव सांबाळला होता, त्यामुळे सामना पाकिस्तानच्या पारड्यात झुकणार असं वाटत होतं. 


इफ्तियार अक्षर पटेलवर आक्रमण करत एका षटकात तीन सिक्स मारत पाकिस्तानची धावसंख्येच्या गतीचा वेग वाढवला. त्यानंतर रोहित शर्माने शमीला बोलावलं त्याने हा निर्णय सार्थ ठरवला. शमीने अर्धशतक करत आक्रमक पवित्रा घेतलेल्या इफ्तियारला 51 धावांवर माघारी पाठवलं.  


शमीनंतर हार्दिकने खतरनाक शादाब 5, हैदर अली 2, मोहम्मद नवाझ 9 यांना माघारी पाठवलं. दुसरीकडे शान मसूदने शेवटपर्यंत नाबाद राहत एक बाजू लावून धरली होती, त्याने 52 धावा केल्या. शेवटला शाहिन आफ्रिदीने एक चौकार आणि 1 षटकार मारत 16 धावा केल्या. भारताच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.