India vs Pakistan: `हार्दिक मला बोलला, फक्त...` विराट कोहलीनं सांगितलं शेवटच्या षटकातील प्लानिंग
T20 World Cup 2022 India Won Against Pakistan: टी 20 वर्ल्डकपच्या पाकिस्तान विरुद्धच्या थरारक सामन्यात भारतानं 4 गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण एक चेंडू एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव काढली आणि विजयावर मोहोर उमटवली.
T20 World Cup 2022 India Won Against Pakistan: टी 20 वर्ल्डकपच्या पाकिस्तान विरुद्धच्या थरारक सामन्यात भारतानं 4 गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण एक चेंडू एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव काढली आणि विजयावर मोहोर उमटवली. पाकिस्ताननं 8 गडी गमववून 159 धावा केल्या आणि विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं हे आव्हान शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर गाठलं. विराट कोहलीने नाबाब 82 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने समाधान व्यक्त केलं आहे.
"माझ्याकडे शब्द नाहीत. हे कसे घडले याची मला कल्पना नाही. हार्दिक मला बोलला, फक्त विश्वास ठेवं की आपण शेवटपर्यंत लढू. शाहीन पॅव्हेलियन एण्डवरून गोलंदाजी करणार होता. मी हार्दिकला सांगितले की आपल्याला या ओव्हरमध्ये जास्त रन्स काढायच्या आहेत आणि झालंही तसंच. हिशोब अगदी सोपा होता. नवाजला एक षटक टाकायचे होते, त्यामुळे मी हरीसच्या गोलंदाजीवर तुटून पडलो. त्यानंतर 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होता. नवाजच्या चौथ्या चेंडूवर मी षटकार ठोकला. आणि आम्ही सामन्यात आलो आणि सामना जिंकलो. ", असं विजयानंतर विराट कोहलीने सांगितलं.
"आजपर्यंत मी सांगत आलो आहे की, मोहाली ही माझी टी20मधील सर्वोत्तम खेळी होती. तेव्हा मी 52 चेंडूत 80 धावा केल्या होत्या, आज 53 चेंडूत 82 धावा केल्या. दोन्ही खेळी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. इतके महिने जेव्हा मी संघर्ष करत होतो, तेव्हा तुम्ही मला सहकार्य केलंत. खूप खूप धन्यवाद.", असंही विराट कोहली पुढे म्हणाला.
दोन्ही संघाची प्लेईंग 11
भारत- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान, बाबर आझम, शान मसूद, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.