T20 India Squads: मॅच विनर खेळाडूला डावलल्याने नेटकऱ्यांचा संताप म्हणाले, `वर्ल्ड कप जिंकणं...`
निवड समितीने या खेळाडूला डावलल्याने क्रीडा वर्तुळात निवड समितीवर होतेय टीका
T20 World Cup : T20 World Cup 2022 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र एक असा खेळाडू आहे ज्याची 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होईल असं सर्वांना वाटत होतं. तो खेळाडूही प्रबळ दावेदार होता. मात्र निवड समितीने संघात समावेश न केल्याने क्रीडा वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
संजू सॅमसन सलामीवीर, मधल्या फळीतील फलंदाज आणि यष्टीरक्षक या तिन्ही भूमिका बजावू शकतो. संजू सॅमसन ज्या पद्धतीने
क्लासिक सिक्स मारतो तशी क्षमता फार कमी भारतीय फलंदाजांमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर नजर टाकली तर संजू सॅमसन आणखी सरस ठरू शकला असता, कारण याआधी उसळत्या खेळपट्ट्यांवर संजू सॅमसन बॅट मोठे फटके मारताना दिसला आहे.
संजू सॅमसन टी-20 मध्ये मॅचविनर खेळाडू आहे. संजू बॅटिंगसह विकेटकीपिंगही चाणाक्षपणे करतो. मिडल आर्डरला येऊनही तो मोठे फटके खेळू शकतो. कोणत्याही गोलंदाजीच्या माऱ्याला मोडीत काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. संजू सॅमसन उत्कृष्ट विकेटकीपिंग आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. संजू मैदानावर एकदा टिकला की नंतर त्याचा बॅटमधून आकर्षक शॉट्स आणि गगनचुंबी सिक्सर आपण IPL मध्ये पाहिले आहेत.
दरम्यान, उपकर्णधार के. एल. राहुल आशिया कपमध्ये मोक्याच्या सामन्यांमध्ये पूर्ण फेल गेला. राहुल संघाचा उपकर्णधार असला तरी त्याच्या निवडीबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, संजू नसेल तर भारताचं वर्ल्डकप जिंकणं अवघड आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.