Team India KL Rahu : टीम इंडियाचा (Team India) ओपनर केएल राहुल (KL Rahul) आणि त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी (Athiya Shetty ) हे दोघे अॅडलेडमध्ये (Adelaide) शॉपिंग (shopping) करताना दिसले आहेत. बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टीची (sunil shetty) मुलगी अथिया शेट्टी सध्या केएल राहुलसोबत ऑस्ट्रेलियात आहे. T20 विश्वचषक 2022 (t20 world cup 2022) मधील टीम इंडियाच्या सामन्यांमध्ये अथिया शेट्टी अनेकदा केएल राहुलला सपोर्ट करताना दिसली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अथिया शेट्टी केएल राहुलसोबत शॉपिंग करताना दिसली


केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा (KL Rahul and Athiya Shetty) एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे अॅडलेडमध्ये शॉपिंग करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय टीमचा ओपनिंग बॅट्समन केएल राहुल पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीसोबत लग्न करण्याची शक्यता आहे. तसेच  हे दोघेजण महाराष्ट्रामध्येच लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. 



अथिया शेट्टीचा केएल राहुलला जोरदार पाठिंबा


टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (KL Rahul and Athiya Shetty) बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या परस्पर संमतीने हे कपल पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये लग्नबंधनात अडकू शकते. T20 विश्वचषक 2022 मध्ये अथिया शेट्टी केएल राहुलला जोरदार पाठिंबा देत आहे. T20 विश्वचषक 2022 मध्ये केएल राहुल तो फॉर्मात आला असून आपल्या फलंदाजीने टीम इंडियाला विजय मिळवून देत आहे.


वाचा  : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू म्हणजे...; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य 


केएल राहुलसाठी अथिया शेट्टी लकी चार्म 


 टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये केएल राहुलची फलंदाजी अत्यंत निराशाजनक होती. पण राहुलने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले आणि अथिया शेट्टी मॅच पाहण्यासाठी अॅडलेडला पोहोचली.