T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या T20 विश्वचषकाला काही दिवसात सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र, अद्याप जसप्रीम बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी कोण खेळणार या प्रश्नाचं उत्तर भारतीय संघाला मिळालेलं नाही. बुमराहऐवजी मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यावर आता जोरदार चर्चा होताना दिसते. अनेक क्रिकेटपटूही याबाबत मत व्यक्त करत आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आपला निर्णय स्पष्टच सांगितला.


काय म्हणाले सुनिल गावस्कर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमी की सिराज? यावर बोलताना सुनील गावस्कर यांनी मोहम्मद सिराजचं नाव घेतलं आहे. सिराजने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे आणि त्याचं फळ त्याला नक्कीच मिळायला हवं, असं सुनील गावस्कर (Sunil Gavaskar statement on t20wc2022) म्हणाले आहेत. मी सिराजची निवड करेल, कारण तो चांगली गोलंदाजी करतोय, शमी काही काळ खेळला नाही, असंही सुनिल गावस्कर म्हणाले आहेत.


आणखी वाचा - बेन स्टोक्सची 'सुपरमॅन' फिल्डिंग, हवेत उडी मारत अडवला SIX, जगभर व्हायरल होतोय Video


शमीच्या गुणवत्तेबद्दल मला शंका नाही, फक्त तो अलीकडच्या काळात कोणतेही क्रिकेट खेळलेला नाही. कोविड नंतर परत येणं कधीही सोपं नसतं, असंही सुनिल गावस्कर म्हणाले आहेत. शमी कोरोनानंतर बरं झाल्याने आता तो संघात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. 


दरम्यान, शमीने 2015 साली ऑस्ट्रेलियात (T20 World Cup 2022 Australia) झालेला वर्ल्ड कप गाजवला होता. त्यावेळी भारताकडून सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शमीचं नाव होतं. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर शमी कमाल दाखवू शकतो. त्यामुळे शमीला संधी मिळेल की नाही, अशी चिंता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. बुमराह जखमी असताना अनुभवी गोलंदाज म्हणून शमीकडे पाहिलं जातंय.