T20 World cup 2022 : टीम इंडियाने 4 सामने जिंकत सेमीफायनलमध्य़े धडक दिली आहे. भारताचा सामना आता इंग्लंड सोबत होणार आहे. (Ind vs Eng) हा सेमीफायनल सामना 10 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे आता प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळेल यावर चर्चा सुरु झाली आहे. (Playing 11 for India vs england semi final)


पंत की कार्तिक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया (Indian Team) सध्या चांगली कामगिरी करत असून अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यावी असा प्रश्न रोहित शर्मा (Rohit sharma) पुढे देखील असणार आहे. यातच भारताचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री (Ravi shastri) यांनी देखील एक सल्ला दिला आहे. रवी शास्त्री म्हणतात की जर भारताला सेमीफायनल जिंकायची असेल तर ऋषभ पंतला खेळवलं पाहिजे. दिनेश कार्तिक हा संघाचा उत्तम खेळाडू आहे, पण जेव्हा इंग्लंडसारख्या संघाविरुद्ध सामने जिंकण्याचा विचार येतो तेव्हा तुम्हाला आक्रमक खेळाडूची गरज असते. ऋषभ पंतने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे.


दिनेश कार्तिकवर विश्वास


T20 विश्वचषकात (T20 world cup) आतापर्यंत टीम इंडियाने ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकवर विश्वास दाखवला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध, दिनेश कार्तिकला विश्रांती देण्यात आली आणि ऋषभ पंतला संघात स्थान मिळालं पण तो फक्त 3 धावाच करु शकला. त्यामुळे त्याला सेमीफायनल आणि फायनलमध्ये संधी मिळणार का याबाबत प्रश्न आहे.


T20 विश्वचषकात दिनेश कार्तिकने अजून काही चांगली कामगिरी केलेली नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध 1, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 आणि बांगलादेशविरुद्ध 7 धावा केल्या आहेत.


भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.


स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.


इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड .


राखीव खेळाडू: टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लेसन.