India Vs Pakistan: `विराट आणि हार्दिक दोघंही...`, विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केल्या भावना
T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील अतितटीच्या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं पाचव्या गड्यासाठी 113 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे विजय शक्य झाला.
T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील अतितटीच्या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं पाचव्या गड्यासाठी 113 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे विजय शक्य झाला. विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा, तर हार्दिक पांड्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.या दोघांच्या कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मानं समाधान व्यक्त केलं आहे. भारतच नाही तर क्रिकेट विश्वातील प्रत्येक व्यक्तीला विराटच्या या खेळीचं कौतूक वाटतंय. विराट कोहलीने विजय खेचून आणल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने देखील त्याला उचलून घेतलं.
" विराट आणि हार्दिक अनुभवी खेळाडू आहेत. शांत राहून आणि शक्य तितक्या धावा करणं महत्त्वाचे होते आणि त्यांनी ते केले. आमच्या आत्मविश्वासासाठी हे चांगले आहे. पहिल्या सामन्यात आम्ही ज्या प्रकारे जिंकलो ते आमच्यासाठी अधिक आनंददायी आहे. विराटला सलाम. ही त्याने खेळलेली सर्वोत्तम खेळी आहे." असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
India vs Pakistan: "हार्दिक मला बोलला, फक्त..." विराट कोहलीनं सांगितलं शेवटच्या षटकातील प्लानिंग
भारतीय संघ- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.