Shahid Afridi on Suryakumar Yadav : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शाहिद आफ्रिदीने सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगचे कौतुक करताना आपल्याच देशाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला फटकारलं आहे. सुर्यकुमारबद्दल आफ्रिदीने केलेल्या वक्तव्यामुळे विश्वास ठेवणं कठीण जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत एकमेकांना मागे टाकण्यासाठी मोहम्मद रिझवान आणि सुर्यकुमार यादव यांच्यात आयसीसी क्रमवारीमध्ये चुरस असलेली पाहायला मिळते. आफ्रिदीने सुर्यकुमारच्या बॅटींगचं कौतुक करत त्याच्या फलंदाजीमधून रिझवानला शिकायला सांगितलं. सुर्यकुमार ज्या प्रकारे शॉट्स खेळतो त्यातून त्याने शिकायला हवं, असा सल्ला आफ्रिदीने दिला आहे. 


आफ्रिदीने केलेल्या या वक्तव्यामुळे भारतीय फैन्स चकित झाले आहेत. कारण आफ्रिदी भारतीय संघाबाबत कोणतं ना कोणतं वादग्रस्त वक्तव्य करताना आपण पाहिलं असेल. कायम भारतीय संघावर टीका करणाऱ्या आफ्रिदीने भारतीय खेळाडूचं  कौतुक केल्याने चाहत्यांनाही विश्वास ठेवणं कठीण जात आहे. 


या T20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये 225 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषक 2022 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमार यादवच्या मारेकरी फलंदाजीमुळे भारतीय संघ यावेळी टी-20 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियासाठी तो चौथ्या क्रमांकावर उतरताच सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीने वादळ निर्माण करण्यास सुरुवात केली.