Suryakumar Yadav On Scoop Shot: टी 20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. असं असलं तरी भारताच्या आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) चर्चा होत आहे. सूर्यकुमार यादव आयसीसी टी 20 च्या फलंदाजी यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे. सूर्यकुमार यादवनं टी 20 विश्वचषकातील पाच सामन्यात 75 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. तीन सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. 360 डिग्रीमध्ये फटकेबाजी करत असल्याने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या स्कूप शॉटची चर्चा रंगली आहे. या स्कूप शॉटबाबत खुद्द सूर्यकुमार यादव याने खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"गोलंदाज कशी गोलंदाजी करणार आहे हे तुम्हाला समजले पाहिजे. त्या क्षणी थोडेसे आधीच ठरलेले असते. मी जेव्हा रबर-बॉल क्रिकेट खेळायचो तेव्हा त्या स्ट्रोकचा खूप सराव केला होता. त्यावेळी गोलंदाज काय विचार करत असेल. फिल्डवर असताना मी त्या लांबीचा अंदाज घेतो. चेंडूच्या गतीला दिशा देतो आणि थेट चेंडू सीमा पार जातो", असं सूर्यकुमार यादवनं स्टार स्पोर्टवरील 'फॉलो द ब्लूज' शोमध्ये सांगितलं. 



टीम इंडिया येत्या गुरूवारी म्हणजेच 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं की, 'इंग्लंड संघ सध्या खूप चांगले क्रिकेट खेळत आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यात अतितटीचा सामना होईल. पण आमचा संघ इथपर्यंत आव्हानांचा सामना करून पोहोचला हे सुद्धा विसरू नये."