T20 World Cup: टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये `या` खेळाडूला स्थान द्या! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं केली सूचना
क्रीडाप्रेमींना सुपर 12 फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामन्याचे वेध लागले आहेत. गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे या स्पर्धेत वचपा काढण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 (Team India Playing 11) काय असेल? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Master Blaster Sachin Tendulkar) प्लेईंग 11 बाबत सूचना केली आहे.
T20 World Cup 2022 India vs Pakistan: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगतदार वळणावर आली असून काही आश्चर्यकारक उलटफेर पाहायला मिळत आहेत. असं असताना क्रीडाप्रेमींना सुपर 12 फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामन्याचे वेध लागले आहेत. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे या स्पर्धेत वचपा काढण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 (Team India Playing 11) काय असेल? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Master Blaster Sachin Tendulkar) प्लेईंग 11 एक डावखुरा फलंदाज असावा, अशी सूचना केली आहे. सचिननं दिलेला हा सल्ला कर्णधार रोहित शर्मा ऐकतो का? हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे.
सचिन तेंडुलकरनं पीटीआयशी बोलताना सांगितलं की,"डावखुऱ्या फलंदाजामुळे संघाची ताकद वाढेल. कारण गोलंदाजांना क्षेत्ररक्षण वगैरे सर्वच अडजस्ट करावं लागतं. त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट झाल्याने गोलंदाजांच्या अडचणीत वाढ होते." भारतीय संघात सध्या ऋषभ पंत हा एकमेव डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा अक्षर पटेल चांगली फलंदाजी करतो, पण फलंदाजीत तितकी आक्रमता नाही. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये दिनेश कार्तिक ऐवजी ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे.
NAM vs NED: नेदरलँडच्या विक्रमजीत सिंगने मारले सलग दोन षटकार, पण कौतुक बाळाचं! Video Viral
डावखुरा रवींद्र जडेजा जखमी झाल्याने भारतीय संघात नाही. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूची उणीव टीम इंडियाला भासणार आहे. आयसीसीने निवडलेल्या प्लेईंग 11 मध्ये सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना पसंती देण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, तर चौथ्या क्रमांकावर आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात आली आहे. पण ऋषभ पंतला संधी देण्यात आली नाही. त्याऐवजी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आलं आहे.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, दीपक हुड्डा