Virat Kohli Make Record Against Netherland: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आक्रमक खेळी केली. विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. आता विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात टी20 वर्ल्डकपमधील एक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. या सामन्यात 90 धावा करताच विराट कोहली टी20 वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरणार आहे. सध्या सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या नावावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेनं टी20 वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक 1016 धावा केल्या आहेत. त्यानंतर वेस्टइंडिजचा आक्रमक खेळाडू ख्रिस गेलनं 965 धावा केल्या आहेत. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 927 धावा केल्या आहे. सध्या जयवर्धने आणि ख्रिस गेल दोघंही खेळत नाहीत. त्यामुळे हा विक्रम मोडण्याची नामी संधी विराट कोहलीकडे आहे. विराट कोहलीने 90 धावा करताच त्याच्या 1017 धावा होतील आणि विक्रम आपल्या नावावर करेल.


IND vs NED: नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला आराम? प्लेईंग 11 मध्ये या खेळाडूला मिळणार संधी


टी20 वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


1- महेला जयवर्धने (श्रीलंका)- 1016 धावा
2-ख्रिस गेल (वेस्टइंडिज)- 965 धावा
3-विराट कोहली (भारत)- 927 धावा