India vs Pakistan T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. भारत-पाक (Ind vs Pak) सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते वाटेल तितकी किमत मोजण्यासाठी तयार असतात. टी20 वर्ल्ड कपही (T20 World Cup) याला अपवाद कसा ठरेल. टी20 वर्ल्ड कपमध्ये 9 जूनला न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट क्रिकेट स्टेडिअमवर भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी नासाऊ स्टेडिअम प्रेक्षकांनी हाऊसफुल झालं होतं. जगभरातून क्रिकेट चाहते खास या सामन्यासाठी न्यूयॉर्कला आले होते. वाट्टेल तितकी किंमत देऊन चाहत्यांनी या सामन्याचं तिकिट काढलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्याने विकला ट्रॅक्टर
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याचा साक्षीदार होण्यासाठा नासाऊ क्रिकेट स्टेडिअमवर तुफान गर्दी झाली होती. कोणी आधीच तिकिटं बूक केली होती. तर कोणी हजाराचं तिकिट लाखात विकत घेऊन हजेरी लावली होती. एका चाहत्याने तर भारत-पाकिस्तान सामना पाहात यावायासाठी चक्क आपला ट्रॅक्टर विकला (Sale Tractor). पाकिस्तान क्रिकेट संघाला चिअर करण्यासाठी तो स्टेडिअममध्ये हजर होता. पण या चाहत्याची चांगलीच निराशा झाली


पाकिस्तानच्या या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी या फॅनने आपला ट्रॅक्टर विकला आणि 3000 हजार डॉलरचं तिकिट विकत घेतलं. पाकिस्तान गोलंदाजांनी भारताची इनिंग 119 धावांवर ऑलऑऊट केल्यावर पाकिस्तानी चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पाकिस्तानचा संघ जिंकता जिंकता अवघ्या 113 धावांवर ऑलआऊट झाला आणि पाकिस्तानी चाहत्यांची स्वप्न भंगली.


ट्रॅक्टर विकून पाकिस्तानला चिअर करण्यासाठी आलेल्या चाहत्याने न्यूज एजेंसी एएनआयला आपली प्रतिक्रिया दिली. यात त्याने म्हटलं. सामना पाहण्यासाठी मी माझा ट्रॅक्टर विकला, अडीच लाख रुपयांचं तिकिट काढलं. जेव्हा भारताचा संघ ऑलआऊट झाला तेव्हा असं वाटलं आम्ही हा सामना सहज जिंकू. पण वाटलं तितका हा सामना सोपा नव्हता. बाबर आझम बाद झाला आण तिथेच पाकिस्तानने हा सामना गमावला. पाकिस्तानी चाहत्यांसाठी हा पराभव निराशाजनक होता, मी भारताच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो, असं या चाहत्यांनी म्हटलंय.



चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव
न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात पहिली फलंदाजी करणारा भारतीय संघ 119 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडिया पूर्ण वीस षटकंही खेळू शकली नाही. याला उत्तर देताना पाकिस्तानचा संघही 7 षटकात केवळ 113 धावा करु शकला.