T20 World Cup 2024 : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तब्बल 13 वर्ष टीम इंडियाला (Team India) आयसीसीचं  (ICC) एकही जेतेपद जिंकता आलेलं नव्हतं. पण अखेर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने हा दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना भावना अनावर झाल्या. कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यातही अश्रू तरळले. विजयानंतर रोहित शर्मा पत्नी रितिका आणि मुलगी समायराला भेटायला भारतीय डगआऊटमध्ये गेला. त्यानंतर त्याने बारबाडोसच्या खेळपट्टीवर जात इथलं गवत खाल्लं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल
रोहित शर्माचा खेळपट्टीवरचं गवत खातानाचा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल झाल्यानंतर युजर्स आश्चर्यचकित झाले. रोहितने असं नेमकं का केलं, याबाबत चर्चा सुरु झाली. याचा खुलासा आता झाला आहे. रोहित शर्माचं आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न होतं. गेल्या दोन आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला अंतिम सामन्यात जाऊनही पराभवाचा धक्का बसला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2023 मध्ये भारतात झालेल्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागाला. पण टी20 वर्ल्ड कप जिंकत रोहित शर्माच्य नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली. यानंतर रोहित शर्माने खेळपट्टीवर जात तिथल्या गवताची काही पाती तोंडात टाकली.


नोवाक जोकोविचनेही केलं होतं तेच
याआधी सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचनेही विम्बल्डन जिंकल्यानंतर टेनिस कोर्टावरचं गवत खाल्लं होतं. 2009 मध्ये जोकोविचने राफेल नदालचा पराभव करत पहिल्यांदा विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं होतं. नोवाक जोकोविचने आठवेळा असा प्रकार केला आहे. 


मुलाखतीत खुलासा
2018 मध्ये एका मुलाखतीत जोकोविचने याबाबत खुलासा केला होता. ही एक छोटीसी परंपार आहे, जेव्हा मी लहान होतो तेव्हा विम्बल्डन जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता हे स्वप्न पूर्ण झालं आहे. ज्या कोर्टवर खेळतो त्या कोर्टचे आभार मानन्यासाठी तिथलं गवताची काही पाती तोंडात टाकली. काही तरी वेगळा जल्लोष करायचा होता असं जोकोविचने सांगितलं होतं. आता रोहित शर्मानेही नोवाक जोकोविचप्रमाणेच ज्या खेळपट्टीवर विजय मिळवला. त्या खेळपट्टीचे ऋण मानावेत म्हणऊन तिथल्या गवताची काही पाती तोंडात टाकली.


रोहितने आभार मानले
रोहितने आयीसी स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचं स्वप्न पाहिलं होतं, आणि ते अखेर पूर्ण झालं. टीम इंडियाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीसाठी रोहित शर्माने वेगळ्या प्रकारे आनंद व्यक्त केला. टी20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.