पर्थ : T20 World Cup 2022 यंदाच्या टी20 वर्ल्ड कपला येत्या 16 ऑक्टोंबरपासून सुरूवात होत आहे. या वर्ल्ड कपसाठी सर्वंच संघ झाले असून रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान आता वर्ल्ड कपला (T20 World Cup) अवघे तीन दिवस उरले असताना या संघाने कर्णधार बदलण्याचा मोठा निर्णय घेतलाय.वर्ल्ड कपच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने अनेक संघांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान हा संघ कोणता असणार आहे ? हा कर्णधार कोण आहे? हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी20 वर्ल्ड कप 2022 च्या (T20 World Cup) विजयाचा प्रमुख दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलिया (australia) संघाने मोठा निर्णय़ घेतला आहे. वर्ल्ड कपला अवघे तीन दिवस उरले असताना त्यांनी कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक प्रतिस्पर्धी संघाने आश्चर्य व्यक्त केले आहे.  


 


हे हि वाचा : T20 World Cup 2022: क्रिकेटमध्ये 'हा' कर्णधार करतो सर्वाधिक कमाई, नेटवर्थ जाणून घ्या


 


'हा' खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत 


एकदिवसीय क्रिकेटमधून अॅरॉन फिंचने (Aaron Finch) निवृत्ती घेतली आहे. त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार याची चर्चा सुरू आहे. त्यात डेव्हिड वॉर्नरला (David Warner) ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाची कमान मिळू शकते अशी चर्चा आहे. शुक्रवारी होणाऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाच्या बैठकीत यावर चर्चा  होण्याची शक्यता आहे. 


आजीवन बंदी 
2018 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बॉल टॅम्परिंगच्या घटनेनंतर डेव्हिड वॉर्नरवर (David Warner) कर्णधारपदावरून आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण वॉर्नरला दुसरी संधी नक्कीच मिळाली पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू सातत्याने सांगत आहेत. याबाबत येत्या शुक्रवारी होबार्टमध्ये होणाऱ्या बैठकीत याबाबत संचालकांची चर्चा होणार आहे. गरज भासल्यास नियम बदलले जातील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष लाचलान हेंडरसन यांनीही या अहवालात नमूद केले आहे. 


लाचलान हेंडरसन पुढे म्हणाले की, 'डेव्हिड वॉर्नर (David Warner) मैदानावर चांगली कामगिरी करत आहे. मैदानाबाहेर राहूनही तो संघाला मदत करू शकतो. वॉर्नरच्या नेतृत्वावरील बंदीबाबतच्या नियमांचे पुनरावलोकन करणे ही पहिली गोष्ट आहे. जर वॉर्नरकडे कर्णधारपद सोपवायचे असेल, तर त्यापूर्वी नियमांमध्ये आवश्यक ते बदल करता येतील. नियमांचे लवकरात लवकर पुनरावलोकन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले आहेत. 


दरम्यान आता अॅरॉन फिंचनंतर (Aaron Finch) ऑस्ट्रेलियाचा वनडे कर्णधार कोण बनतो? याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.